पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/204

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामाजिक सुधारणेचे मार्ग १८९ होण्यास कारण होतात ! साराश, समाजरचनेपेक्षा लोकांमध्यें एक प्रकारचा आपल्या संस्थाबद्दल व देशाबद्दल अभिमान जागृत ठेवण्याची प्रत्येक देशकल्याणाकरितां झटणया माणसानें आधी तजवीज ठेविली पाहिजे. जुन्यास सोडून जाता कामा नये. असे नुसते शब्द वापरल्यानें हा कार्यभाग होत नाहीं, तो होण्यास जुन्या संस्थाबद्दल खरोखरच योग्य अभिमान वाटावयास पाहिजे. * योग्य ? असे म्हणण्याचे कारण एवढेच की, हल्लीच्या काळात सर्वाशी अगर सर्वतोपरी जुन्या संस्था चालणे दुर्घट आहे, हें आम्हासही मान्य आहे. पाश्चात्य राष्ट्राची व आमची कर्मधर्मसंयोगामुळे जी सागड पडली आहे तिचा साखळीच्या दोन्ही दुव्यावर परिणाम झाल्याखेरीज रहावयाचा नाही. तथापि तेवढ्यामुळेच आमच्या समाजरचनेचा पाया खणून काढून पुनः नवा पाया घातल्याखेरीज चालावयाचे नाही, असे मात्र आम्हास वाटत नाही. रा०ब० रानडे व डेॉ० भाडारकर याची दिशा याहून भिन्न आहे. जातिभेद मोडून स्त्रियास करारशास्रातील सिद्धाताप्रमाणें मोकळीक मिळाल्याग्वेरीज देशाचे पुढे पाऊल पडावयाचे नाही, असे त्याच्या मुखातून अनेक वेळा उद्गार निघालेले आहेत; व या उद्भारास अनुरूप अशीच गेल्या २५॥ ३० वर्षातली त्यांची वर्तणूक आहे. अलीकडे अलीकडे या विद्वानाचे काही उद्गार निराळ्या तव्हेचे येऊ लागले आहेत, पण हा फेरफार अद्याप बराच वरकरणी आहे असें आम्हास वाटते. मिसेस अॅनि बिझांट याचीं ज्याप्रमाणे युरोपातील समाजरचनेची तत्त्वें चुकीची आहेत अशी खात्री झालेली आहे व तशी खात्री झाल्यामुळे हिंदुसमाजाच्या समाजरचनेचीच मूलतत्त्वे इह व परलोकी प्रत्येकास अधिक हितावह आहेत असे त्या सागत फिरत आहेत, त्याप्रमाणे आमच्या सुधारकवर्गाची अद्याप पुरी समजूत झालेली नाही; व त्यामुळेच बूथसाहेब अगर पंडिता रमाबाई याच्या सारख्याच्या ते सहज नादी लागतात. हिंदुसमाजाच्या स्वरूपात अगर रचनेत फेरफार व्हावयास नको अगर तो व्हावयाचा नाही, असे आम्ही म्हणत नाही. प्राच्य व पाश्चात्य, अध्यात्मिक व आधिभौतिक अथवा वर्णव्यवस्थाकित व यदृच्छाचारप्रवर्तक अशा नव्या जुन्या सुधारणाचा संयोग झाल्याने जुन्या समाजरचनेच्या तत्त्वात काहीं तरी फेरफार झाला पाहिजे व होईल, हे म्हणणें कोणासही मान्य करावें लागेल त्याबद्दल वाद नाहीं. वाद काय तो एवढाच की, वर ज्या दोन तञ्हेच्या सुधारणा सागितल्या त्यांपैकी एकीचा लोप करून दुसरी स्थापन करावयाची अथवा जुन्या संस्थेतच योग्य असे कांहीं फेरफार करून तिचे पुनरुज्जीन करावयाचे. रा. ब. रानडे म्हणतात तो मतभेद हाच होय. व याचकरितां प्रसंग विशेषीं मोठाली रणे माजतात. हिदुस्थान देशात अनेक जातीचे, पंथांचे व धर्माचे लोक आहेत. या सर्वाची एकवाक्यता करण्यास एक भाषा, एक धर्म, सवींचे एकमेकाशीं अप्रतिबंध रोटीबेटीव्यवहार याखेरीज दुसरा मार्ग आहे कीं नाही व असल्यास तो कोणता हा एक अत्यत महत्त्वाचा प्रश्न आहे. आमच्या