पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/203

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Rくく लो० टिळकांचे केसरींतील लेख ती मोडल्याखेरीज देशाच्या भावी उत्कर्षाचा आरंभही व्हावयाचा नाहीं इत्यादि अपरिपक्व विचार आतां सर्वाशीं फारच थोड्या लोकांस ग्राह्य वाटतात अशी स्थिति आली आहे. ही स्थिति येण्यास इंग्रजी विद्येचा अतिपरिचय हें एक तर कारण खरेंच, पण त्याखेरीज आमच्या देशाच्या प्राचीन विद्येचे युरोपियन लोकानीं केलेलें पुनरुज्जीवनही बयाच अंशी हा परिणाम घडवून आणण्यास कारणीभूत झालेले आहे. एक प्रसिद्ध इंग्रजी इतिहासज्ञ कायदेपंडिताचे असे मत आहे कीं, युरोपांतील राष्ट्राची सुधारणा होण्यास त्यांतील वर्णव्यवस्था मोडून समाजाची रचना परस्पराच्या सोई व करार यांवर उभारली गेली हें मुख्य कारण होय. वर्णव्यवस्थेत प्रत्येक मनुष्याचा धंदा अथवा उद्योग त्याच्या इच्छेतून भिन्नकारणानी नियंत्रित झालेला असतो. परंतु युरोपांतलि स्वतंत्र देशात इवा तो धंदा हवा त्यास करण्यास मोकळीक असते, त्यामुळे परस्पराची चढाओढ लागून चागले तेवढेच लोक पुढे येतात व बाकीच्यास अन्नाचीही भ्रात पडते असे आता पूर्णपणें आढळण्यात आले आहे. साराश, कोणतीही समाजरचना घ्या, ती सर्वोशीं निर्दोष म्हणून कधीही असावयाची नाहीं, हें तत्त्व आतां ब-याच लोकाच्या लक्षात येऊन चुकले आहे. ** चातुर्वण्र्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः ?’ हा हिंदुसमाजाचा पाया आहे; व इच्छेस येईल तसे करण्यास प्रत्येकास, तो कराराने बांधला नसल्यास मोकळीक आहे, हें पाश्चात्य राष्टांतील समाजरचनचे तत्त्व आहे. आता रा. ब. रानडे वगैरे काहीं गृहस्थांचे असे म्हणणे आहे की, आमच्या समाजाची इमारत या पूर्वीच्या पायावरून ओढून या दुस-या पायावर ठेविली पाहिजे. नाहीपेक्षा एकोणिसाव्या शतकाच्या राष्ट्रीय झगड्यांत आपला निभाव लागणार नाही ! आमच्या मत हें सयुक्तिक नाही. युरोपांतील राष्ट्राच्या समाजाची घटना जरी निराळ्या तत्त्वावर झाली असली तरी त्या राष्ट्रातील समाज पद्धतीपासून वाईट परिणाम होत नाहींत असे नाही. * गाव आहे तेथे म्हारवडा आहेच ’ या म्हणीप्रमाणे युरोपातील राष्ट्रातही समाज सुधारणा होण्यास अद्याप पुष्कळ जागा आहे. चढाओढीच्या तत्त्वावर रचलेल्या समाजात संपत्तीची सारखी वाटणी न होतां कांहीं आतेशय श्रीमंत व काहीं आतैशय दरिद्री अशी स्थिति प्राप्त होते; आणि विवाह संस्कारासही कराराचे स्वरूप आल्यामुळे विधवाच्या ऐवजीं कुमारिकांची संख्या वाढून गृहस्थाश्रमाच्या सुखास पुष्कळ स्त्रिया अंतरतात. या दोन उदाहरणांवरून अमुकच तत्त्वावर समाजाची रचना झाली असल्यास ते राष्ट्र सुखी होतें, हें म्हणणें किती अविचाराचे आहे हें लक्षात येईल. स्वतंत्रतेचा किंवा राष्ट्रीयत्वाचा अभिमान म्हणून जेो कांही जोम आहे, तो जोपर्यंत जागृत असते तोपर्यंत समाजरचना कशीही असली तरी त्यातील दोष राष्ट्राच्या उन्नतीस अथवा भरभराटीस आड येत नाहीत. पण एकदा कां तो जेोम नाहींसा झाला म्हणजे तेच दोष रावणाच्या धनुष्याप्रमाणें छातीवर बसून जगांत त्या लोकांची उपहास्यता