पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/201

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८६ लो० टिळकांचे केसरींतील लेख अगदीं भ्रांतिमूलक व निराधार आहे. मुंबईच्या एका इंग्रजी वर्तमानपत्रानें डॉ. साहेबांच्या या वाक्यांचे अवतरण घेऊन स्पष्टेक्तिबद्दल त्यांचे मेोठे अभिनंदन केलेले आहे; पण हें अभिनंदन इसापनेितीतील झाडावर मांसाचा तुकडा चोंचीत घेऊन बसलेल्या कावळ्याचे कोल्ह्यानें जें अभिनंदन केलें त्यासारखे आहे. जातिभेद सर्वशी मोडल्याखेरीज एकराष्ट्रीयता व्हावयाची नाहीं व वरच्या जातीनी खालच्या जातींस आणि पुरुषानीं स्त्रियास आपआपल्याप्रमाणेच सर्व हक्क दिल्याशिवाय ते राजकीय हक्कास पात्र होत नाहीत हे डॉ. साहेबांचे बेोल ग्याझेट,टाइम्सकत्यांस का प्रिय होऊ नयेत ? पण ह्या पत्रकारास आमचे एवढेच विचारणें आहे कीं, तुमच्या देशाजवळच आयलंड देशात या सर्व सुधारणा कधींच झालेल्या असता व इंग्रजाचा व ऐरिश लोकांचा शरीरसंबंधही होत असतां त्यांस हें हृक्क अजून का मिळत नाहींत ? साराश, राजकीय हक्क मिळण्याचे अगर मिळविण्याचे मार्ग दुसरे आहेत. हिंदुस्थानातील देन चार विधवांचीं लग्ने या सालांत जास्त लागली, किंवा दहा पाच विधवानीं केशवपन केले नाहीं तर त्यानें या राजकीय प्रश्नाचा उलगडा होण्यास यत्किचितही मदत होण्याचा संभव नाहीं. हें तंत्र निराळे आहे व त्याकरितां उद्येोगही निराळ्याच प्रकारचे व्हावयास पाहिजेत. महाराष्ट्रात ज्या वेळेस स्वतत्रता वास करीत होती, व ज्या वेळेस तेथील पुरुषाचे अंगात कर्तबगारी आणि शैौर्य हीं खेळत होतीं त्या वेळेस त्यांनी त्यांस योग्य वाटल्या त्या सामाजिक सुधारणा बिनदिक्कत अमलांत आणल्या आहेत. त्या इतक्या की, बंगाल, मद्रास अगर हिंदुस्थानातील दुसरे प्रांत यांपेक्षांही महाराष्ट्रांतील स्रियास पुष्कळ आधक स्वतंत्रता व मान आहे असे त्या त्या प्रातांतील लोकही कबूल करितात. अशा स्थितीत आम्हीं पुन्हा इंग्रजी ग्रंथकाराचे, आधिकाच्याचे, किंवा वर्तमानपत्रकाराचे म्हणणें झलून त्याप्रमाणे आपणही बोलण्यास लागावे हें मेोठे लाछनास्पद आहे. आधी सामाजिक सुधारणा करून आणि मग देशोन्नतीस लागलेले किती दाखले डॉ. भांडारकर यांच्यापाशीं आहेत हें आम्हांस माहीत नाही. आमच्या दृष्टीस जी एक दोन उदाहरणें पडतात तीं त्याच्या उलट आहेत. त्यावरून डॉ. भाडारकर याचा सिद्धान्त समर्थन होत नाहीं इतकेंच नव्हें, तर त्याचे अगदीं विरुद्ध अनुमान निष्पन्न होतें. राजकीय इक्क संपादनाचे हें तत्त्व डॉ. भाडारकर यानीं पूर्णपणे लक्षात घ्यावयास पाहिजे होतें पण तसें न करिता त्यांनी आपल्या भाषणात जाता जाता राजकीय चळवळीस दूषणें देण्याचा जेो प्रयत्न केला आहे तो अगदीं असमंजसपणाचा आहे. स्थलसंकोचास्तव या विषयांवर जें अधिक लिहिणे आहे तें पुढील खेपेस लिहूं.