पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/200

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामाजिक सुधारणेचे मागे १८५ आहे. कोठे बुद्ध, केोठे लूथर आणि कोठे आमचे सुधारक. ज्या राजबिंड्या पुरुषार्ने आपल्या प्रिय पत्नीच्या व राज्याचा त्याग करून लोकांस सन्मार्गाचा उपदश करण्यांत आपलें आयुष्य घालविले त्याची योग्यता कोणीकडे आणि आमच्या सरकारी नोकरी मार्गे धावणाच्या आणि जिव्हालौल्याकरिता आपल्या तकोत न झालेल्या गोष्टी करूं इच्छिणाच्या सुधारकाची योग्यता कोणीकडे ? आमचे बंधू अमृतबझार पत्रिकाकार म्हणतात त्याप्रमाणें सामाजिक सुधारणा म्हणजे सरकारी नोकरीतील काहीं इसमास पुढे येण्याचा हा एक मार्ग झालेला आहे. बाकी रामदास तुकारामाच्या गोष्टी त्यानीं सागाव्या आणि आम्ही ऐकाव्या इत• कॅच. या भावी धर्मसंस्थापकापैकी एकानेही पदरास झीज लावून घेतली नाही अथवा रामदास तुकारामाप्रमाणें संसार त्याग केला नाहीं. असल्था लोकानी आरंभिलेल्या कृत्यास यश न येतां त्यांची व त्याच्या कृत्याची उपहास्यता होऊं लागली तर त्यात अपराध तरी कोणाचा ? सामाजिक सुधारणा करण्याचे हिंदुस्थानच्या निरनिराळ्या प्रदेशातून निरनिराळे मार्ग आहेत ही गोष्ट जर रा ब. रानडे यांस मान्य आहे तर मग सदर सुधारणेबद्दल महाराष्ट्रातच त्याच्या पक्षाने एवढा बखेडा मजिविण्याचे कांहीं कारण नव्हते. आमच्यातील वेदाती लोकानीं निरनिराळ्या धर्मपंथाची ज्याप्रमाणें निरभिमानबुद्धीनें एकवाक्यता करून घेतली आहे त्याचप्रमाणें सामाजिक सुधारकानीं करून घ्यावयास नको आहे काय ? जुनें सोडून सुधारणा व्हावयाची नाहीं. जातिभेद मेोडावयाचा असल्यास ती हळुहळू मोडला पाहिजे. सोन्याची सुरी म्हणून उरात भेौसकून घेण्यात कांहीं अर्थ नाहीं इत्यादि विचार डॉ. भांडारकर याच्या भाषणात मधून मधून आलेले आहेत. पण त्याचबरोबर आमच्या जातिबाधवास जर आपण आपले हक्क देण्यास तयार नाही, तर इंग्रजसरकारनें तरी आम्हास राजकीय हक्क कां द्याव ? असे अव्वल इंग्रजीतील काही अपरिपक्व विचार प्रदर्शित केलेले आहेत. विचारसरणीमधील या भदावरून डॉ भाडारकर यांच्या विचारपद्धतींत हल्ली जे थोडाबहुत फरक पडला आहे तेो काहीं तरी बाह्यकारणामुळे पडला असावा असें अनुमान होतें. आम्हीं आपल्या बायकास शिक्षण दिले नाही तर इंग्रजसरकार आपणास राजकीय हक्क देणार नाहीं इत्यादि विधानै आतां सर्वोस अगदीं पोरकट वाटू लागली आहेत. आमचे सुधारक ज्या काहीं सुधारणा हल्लीं. करू इच्छित आहेत त्या सर्व आयलंडात झालेल्या आहेत. विधवाविवाह आहे, प्रैौढविवाह आहे, जातिभेद नाहीं, मासमद्यसेवन यथेच्छ सुरू आहे, पण बिचारें आयलैड सातआठशें वर्षे धडपडत असताही अद्याप परवशतेच्या निरयस्थितींतून बाहेर पडत नाहीं, यामुळे सामाजिक सुधारणा नको असें आम्हीं म्हणतों असे कोणीही समजूं नय. आमचे एवढेच म्हणणे आहे कीं, डॉ. भाडारकर यानीं सामाजिक सुधारणेचा व राजकीय हक्काचा जो हा संबध जोडला आहे तो २३