Jump to content

पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कोंकणस्थ, देशस्थ व कन्हाडे 년, मध्यें विकोपास जाण्याचा जसा संभव असतो, तसेच एकाच प्रातांतील किंवा हवेंतील लोकाचे विवाहसंबंध शंकडे वर्षे तेथल्यातेथेच घडू लागतील तर तद्देशीय लोकाचे वर सागितलेले दोष किंवा विकार कधीही निर्मूळ व्हावयाचे नाहीत. एवढेच नव्हे, तर ते उत्तरोत्तर वंशपरंपरेनें फार जोरानें वृद्धिंगत होत जातील; परंतु जर तेच विवाहसंबंध दुस-या हवेतील लोकाशी होऊं लागले तर त्या त्या लोकाचे विचार व दोष वंशपरंपरेनें चालू न होता कालातरानें त्याचा समूळ नाश होण्याचा संभव आहे. वर सांगितलेले दोष तद्देशीय लोकाचीच वतनै की होऊन राहिली आहेत, याचे कारण विचारांती सहज लक्षात येण्याजोगें आहे. कल्पना करा की, काही शतकापूर्वी ब्राह्मणाची एक टेोळी कोंकणात जाऊन राहिली, व दुस-या एका टोळीनें देशांत वसाहत केली. त्या वेळेस दळणवळण कमी असल्यामुळे कोकणातील लोकास देशात किवा देशावरील लोकास कोकणात आपल्या मुली देणें फार कठीण पडे, व त्यामुळे त्यांना आपापल्यातच विवाहसंबंध करावे लागले. आतां जे लोक कोंकणांत जाऊन राहिले, त्याचे प्रकृतीवर काहीं पिढया लोटल्यावर तेथील हवा, पाणी, आहारविहार इत्यादिकांचा संस्कार घडून आला. डोळ्याचा अधूपणा हा ह्या परिणामापैकीच. विवाहसंबंध तेथल्यातेथेच होत असल्यामुळे, उभयस्त्रीपुरुषामध्यें एकाच दोषाचा योग जमून येऊन तो दोष वंशपरंपरेनें वाढत जाऊन काहीं पिढयानंतर सर्वत्र कायम होऊन राहिला. असो; याप्रमाणें निरनिराळ्या प्रातांतील लोकाच्या प्रकृतीमध्यें काहीतरी एक विशेष प्रकार कायमचाच होऊन राहतो. दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवण्याजेागी ही कीं, जरी एका प्रदेशांतील लोक पुढे काहीं दिवसांनी दुसच्या प्रदेशांत गेले तरी पुष्कळ वर्षापर्यंत त्यांच्या मूळ प्रकृतींत फरक पडत नाही. कोकणस्थ, देशस्थ व कन्हाडे असे जे तीन भेद आहेत, ते मूळारभी देशपरत्वे झाले आहेत, हे त्याच्या नावावरून उघड आहे. आरंभी हे लोक ज्या ज्या प्रदेशात होते, त्या त्या प्रदेशाच्या स्थितीप्रमाणे त्यांच्या प्रकृतीमध्यें फरक उत्पन्न झाले आहेत, व जरी साप्रत ह्या तिन्ही शाखा एकाच प्रदेशात पसरल्या आहेत, तरी बारकाईनें पाहूं गेल्यास मूळारभो देशपरत्वें उत्पन्न झालेला भेद त्यांजमध्ये अद्यापि आढळतो; व ह्या दृश्य भदावरून त्याच्या प्रकृतींमध्येही मूळारंभीं हवापाणी इत्यादि कारणांनी उत्पन्न झालेला भद अजून कायम असावा असें अनुमान करण्यास जागा आहे. हें जर खरें आहे, तर ह्या तिन्ही शाखांमध्यें परस्परविवाहसंबंध सुरू केल्याने शरीर सुदृढ होण्याचा किती संभव आहे बरें ? ही गोष्ट वाचकाच्या मनावर चांगली ठसण्याकरिता आम्ही येथे दोन प्रकारची उदाहरणे देतों. युरोपियन व हिंदु याच्या शरीरसंबंधापासून जी युरेशियन नावाची प्रजा झाली आहे, ती मूळच्या दोन्ही जातींपेक्षां फार सुदृढ आहे असें पुष्कळाचे म्हणणे आहे. ह्या उदाहरणावरून भिन्नज्ञातीय म्हणजे भिन्नप्रकृतीच्या लोकांच्या संसर्गापासून जी संतति होते, ती सुदृढ असते, हें सिद्ध होतें. आतां याच्या उलट ज्या लोकांमध्ये जवळच्या आप्ता