पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/199

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Rく9 लो० टिळकांचे केसरीतौल लेख यांचेच जर आपण उदाहरण घेतले तर तेवढयावरूनही ही गोष्ट शाबीत होईल. प्रार्थनासमाजाच्या एका अध्वर्युर्ने ज्ञानेश्वराचे चरित्र अथवा भाक्तविजयांतील संत चरित्रे मोठया प्रेमळ अंत:करणानें गाऊं लागावीत, अथवा दुस-या एका गृहस्थानें अद्वैतमतांचा महिमा गावा हा कांहीं कालाचा लहानसहान प्रवाह नव्हे. हिंदुधर्म कसा आहे, त्यांत किती गोष्टी इतर धर्मापेक्षां चांगल्या आहेत, हिंदू लोकांच्या रितीभातैपैिकीं सकारण अतएव ग्राह्य व निष्कारण अतएव त्याज्य कोणत्या इत्यादि गोष्टींचा खुलासा होण्यास आज जीं साधनें उपलब्ध आहेत तीं पंचवीस तीस वर्षांपूर्वी नव्हती त्यावेळीं असं वाटत होते कीं, आम्ही आमच्या राज्यकत्र्याच्या मानार्ने पाहिलें तर किती वेडगळ आणि किती अडाणी ! काय त्या आमच्यांतील जाती आणि काय आमचे अज्ञान; आमच्या बायका तरी कायहेो अडाण्यातल्या अडाणी. अशा रीतीनें अधगवायू झालेला हा देश आपले डोके वर कसे काढणार ? करितां आतां कांहीं विलंब करून उपयेोगी नाहीं. स्त्रियाच्या शाळा काढा, विधवांचीं लझें लावा, जातिभेद मोडून टाकून सबगेोलकार करा आणि एका निराकार परमेश्वराची दर रविवारीं गुडघे टेंकून डोळे मिटून प्रार्थना करीत जा म्हणजे तो सच्चिदानंद परमात्मा तुमची मनकामना एका क्षणतेि पूर्ण करील ! पंचविसाच्या ठिकाणीं तीस वर्षे झालीं; आमचे वेडे लेोक या उपदेशास ताबडतोब भुलून जाऊन देशोन्नतीचा नवा पाया घालतील अशी या पूर्वे सुधारकांची समजूत झाली होती ती हळूहळू नाहींशी होत चालली आणि निराकार परमेश्वराच्या पथाचा प्रसार करण्यास मक्त भिळावयाचे तेही निराकारच मिळाल्यामुळे त्या पंथास अजूनपर्यंतही कांहीं आकारें आला नाही. विधवा विवाहाची ज्या लोकांनीं प्रवृत्ति पाडण्याचा उद्योग केला तेच स्वत: त्यापासून पराङ्मुख झाले आणि इंग्रजी शिक्षणाचा परिणाम मनुष्याच्या मनावर विपरीत होती असे इंग्रजी शिकलेल्या विद्वान् लोकाच्या स्वैच्छ आचारविचार आहारविहारादि वर्तवरून लोकांस पक्के कळून आलें. रा. ब. रानडे यांनी आपल्या दुस-या व्याख्यानांत अशी प्रौढी गायिली आहे कीं, आम्हां सुधारकांस बहुजन समाजाचे पाठबळ नाहीं ही गोष्ट खरी आहे, पण हें पाठबळ नसले म्हणून काय झाले ? आमचा आधार याहून विशेष मजबूत आहे. तो केोणता म्हणाल तर सत्व व एकनिष्ठा हा होय. सत्य जोपर्यंत आमचे बाजूस आहे व जॉपर्यंत आपण सत्या करितां व न्यायाकरितां भांडत आहोत तोपर्यंत आपलाच विजय होईल याबद्दल शंका नाहीं. रा. ब. रानड्यांचे हे शब्द खरोखरच सर्वोनीं लक्षांत ठेवण्यासारखे आहेत. सत्य व एकनिष्ठा नको आहे तरी कोणास ? दोन्ही पक्ष सत्याचकरिता भांडत असतात, पण एका प्रसिद्ध कवीनें म्हटल्याप्रमाणे सत्यमात्र दोघांचा अव्हेर करीत असतें. रा ब. रानडे यांनीं मोठया मार्मिक रीतीने अपल्या सुधारक मंडळीस खिस्ती संतांची उपमा दिल्यासारखी केलेले आहे; व डॉ. भांडारकर यांनीही सर्वश बुद्धाच्या वचनानें आपल्या भाषणाचा उपसंहार केला