पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/195

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Rくo लो० टिळकांचे केसरींतील लेख झाले आहे. तेव्हा तसला मूर्खपणा पुनः होऊं न देण्याविषयी आपणास जपलें पाहिजे. तसेच सत्तावनाची धामधूम व तिचे अखेर पर्यवसानं यांपासून आणखीही पुष्कळ गोष्टी लोकानीं शिकण्यासारख्या आहेत. त्या काळाचा खरा इतिहास जेव्हां लिहिला जाईल तेव्हाच त्या नीटपणें उमगतील. सध्या तरी हें अवघड काम आमच्यापैकी कोणी हाती घेईल असें दिसत नाहीं. तथापि त्याची आवश्यकता भासू लागली आहे; व त्यापैकीं एक पूर्ण करण्याचे श्रेय आमच्या एका सन्मित्रानें नुकतेंच घेतले आहे याबद्दल त्यांचे अभिनंदन करणें जरूर आहे. रा. रा, पारसनीस यांनी लिहिलेले झाशीकर लक्ष्मीबाईचे चरित्र तीन चार महिन्यापूर्वी प्रसिद्ध झालें, व आजपर्यंत आमच्या वाचकापैकीं बरेच लोकांच्या पाहाण्यांतही ते आले असेल. ज्यानीं तें वाचलें असेल त्याना त्यातील गुण निराळे दाखविण्याची जरूर नाहीं, व ज्यानीं पुस्तक पाहिले नाही त्यांना सागून त्याची गोडी कधीही कळावयाची नाही. तव्हां निरर्थक प्रशंसा करण्यात कालक्षेप न करता, आम्ही इतकेच सागते कीं वर ज्याप्रकारचा इतिहास पाहिजे म्हणून सूचित केलें त्या धर्तीवर हे पुस्तक लिहिले असल्यामुळे इतिहासाभिज्ञांस तें फारच मीलवान् होईल. सदहूँ पुस्तकात बंडाच्या एका अंगाचीच हकीकत दिली आहे. तथापि, ती विस्तृत, साधार व मोठ्या मार्मिक रीतीनें वाचकांपुढे मांडली असल्यामुळे तीवरून एकंदर धामधुमीविषयी सहज अनुमान करता येतें. बंडातील नायकासंबंधार्ने इंग्रज कलमबहाद्दरानीं कशा खोट्या गोष्टी लिहून ठेविल्या आहेत है ज्याला पाहावयाचे असेल त्यानें पारसनीसाचे पुस्तक अवश्य वाचावें, महाराणी लक्ष्मीबाईवर आणलल्या अनेक आरोपाचे चरित्रकारानी ठिकठिकाणीं टीपा देऊन मुद्देसूद खंडन केले आहे. झाशीची राणी कोणी महत्त्वाकांक्षी बंडखेोर-कृत्या नसून कपटपटु डलहौसीच्या अपहारबुद्धीने सर्वस्वी नाडलली व अतिशय जुलुमामुळे बेफाम होऊन गेलेली गरीब गाय होती असें त्यांनीं मोठ्या खुबीनें दाखविले आहे निकट पाठलाग केला असता निरुपद्रवी हरीणही पारध्यावर उलटतात किंवा वरील अवतरणातर्गत सुभाषितांत म्हटल्याप्रमाणें आति घर्षणाने चेदनातूनही ठिणग्या निघतात, तेव्हा लक्ष्मीबाईसारखी मानी स्रो आपले नैसर्गिक भीरुत्व क्षणभर विसरून जाऊन बंडखेोरास मिळाली यांत नवल तें कोणतें ? लॉर्ड डलहौसीचा अनावर लोभ कितीकांस जाचला हें पाहाण्याचे हें स्थल नव्हते; पण लक्ष्मीबाईसारख्या अनाथ विधवेवर हा त्यांचा अम्मल चालू व्हावा यावरून त्या वेळचे मुख्य अधिकारी किती स्वार्थपरायण झाले होते व त्यांना पुनः ताळ्यावर आणण्यास बंडासारख्या कडक मालेची किती जरूर होती हें सहज लक्षांत येईल. नाना किंवा तात्या किंवा इतर बंडवाले यांचे दुसरे कांहीं हेतु असतील; पण झांशीची राणी तरी इंग्रजांच्या जुलमाला त्रासून व स्वेच्छेविरुद्ध त्या भेौवयात सापडली व स्रोजाति पडल्यामुळे लवकर निसटणें तिला दुरापास्त झालें, हें प्रस्तुत