पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/194

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

झांशीधा राणी १७९ ण्यांत कित्येकांना पुरुषार्थ वाटत असेल, पण आमच्यामतें त्यापासून अतिशय नुकसान झाले आहे, इसापनीतींतील सिहाचे चित्र काढणाच्या चिताच्याप्रमाणें इंग्रजानीं आमचे इतिहास लिहावे व आम्ही ते श्रुतिप्रमाण मानून त्याचे पठणपाठण करण्यातच संतोष मानावा ही आमच्या परावलंबनाची सीमा नव्हे काय ? तीस पसतीस वर्षीपूर्वी झालेल्या आमच्यांतील लेोकाविषयी परकीयानीं केलेले असत्प्रलाप जर आमच्यार्ने खोडून टाकवत नाहीत तर हजार देन हजार वर्षांपूर्वीं आमचे पूर्वज कसे होते हें आम्हांस कसे समजणार, व आमच्या विद्याकलादिकाचे पुनरुज्जीवन तरी कसे होणार ? केितएिक इंग्रजानी सत्तावनच्या बडाचे बरवाईट इतिहास लिहून ठेविले आहेत; तथापि इग्लिश लोकाना त्या धामधुमीचे खरें स्वरूप व महत्त्व कळत असल्यामुळे त्याची जिज्ञासा अजून तृप्त होत नाहीं व नवीन ग्रंथ बाहेर पडला की त्याजवर वाचकाच्या उडया पडत आहेत. पण आम्ही कसले खप्पी ! अगदीं डोळ्यादेखत घडलेल्या गोष्टीचा विपर्यास होत असताही आम्ही बेफिकीर ! पेशव्यांच्या अन्नावर वाढळलीं व पेशव्यांमुळे नांवारूपास आललीं शैकडॅी घराणी जेथे ह्यात आहेत तेथ पेशव्याचा शेवटचा वंश बंडखेोर ठरतो, तात्या टेपे लुटारूंचा नाईक होतेो, व झाशीच्या राणीस कुलटेची पदवी मिळते तरी आम्हास बिलकुल पवी नाही; उलट आम्ही ते ग्रथ मोठ्या आवडीनें व आदरानें वाचतो. आमच्या देशाविषयी प्राचीन माहिती मिळत नसल्याबद्दल हयगय दाखविण्यात येते, व आमच्या पूर्वजांमध्ये गिबन, हालन, मेकॉले अवतीर्ण झाले नाहीत म्हणून त्याचा उपहासही करण्यात येतो; पण तीसचाळीस वर्षांपूर्वीची खरी हकीकत आम्हास मिळू नये व ती मिळविण्याविषयीं उत्कठाही वाटू नये हें आश्चर्य नव्हे काय ? किंवा आश्चर्य तरी कसलें ? बंडखोर ठरलेल्या लोकाची यदाकदाचित् तरफदारी केली आणि खाविंदसरकारची मर्जी खप्पा झाली तर उगीच पंचाईत; तेव्हा हा भानगड कोण करतो. आमची राजनिष्ठा इतकी जाज्वल्य आहे कीं यत्किचित् संशयाचा डागही तिला खपत नाहीं ! पण वस्तुतः सत्तावनच्या बंडाची खरी इकिकत जितकी बाहेर येईल तितकें इंग्रज राज्यकत्यांना व लोकाना दोघांनाही फायदेशीरच आहे हें आमच्या लोकांच्या अजून लक्षात येत नाहीं. डलहैोसीसाहेबांनी जे अनन्वित प्रकार केले त्यामुळे पुढील अनर्थ गुदरला ही गोष्ट आता सर्वास महशूर आहे. के, इव्हान्सबेलप्रभृति इंग्रज ग्रंथकारानीही ती प्राजलपणे कबूल केली आहे. तेव्हा घडलेल्या चुका व त्यांचे परिणाम याविषयीं विश्वसनीय व सविस्तर माहिती आपणांस नको काय ? हवेंत चेोहींकडे सामसूम असता एकदम बावटळ किंवा धरणीकंप होतो तशी १८५७ एप्रिलअखेर एकाएकीं कलकत्त्यापासून दिल्लीपर्यंत धूमाकूळ उडून गेल्यामुळे इंग्रज लोकांना हिंदुस्थानात केव्हा काय होईल कोण जाणे अशी दहशत बसून गेली आहे. पण वस्तुतः तें बंड कित्येक वर्षे आत धुमसत असून بينهم आधिकाच्यांच्या मूर्खपणामुळेच लवकर उमगलें नाहीं हें आता निर्विवाद सिद्ध