पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/193

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७८ लो० टिळकांचे के९,रातील लेख

  • झांशीची राणी

तेजस्विनि क्षमासोरे नाति कर्कश्यमाचरत्। अतिनिर्मथनादग्निश्चन्द्नादपि जायत । सत्तावन सालची धामधूम होऊन अडतीस वर्षे झालीं, तथापि त्या प्रसंगाची आठवण झाल्याबरोबर मन चरकत नाहीं असा हिंदुस्थानांत माणूस विरळा. बड्या गदांचे साल हिंदुस्थानच्या इतिहासांत ठळक अक्षरानी नमूद केलेलें राहील. त्याचे नाव काढल्याबरोबर आवेश, भय, उद्वेग इत्यादि अनेक विकारानीं प्रत्येक हिंदुस्थानवासी पुरुषाचे मन ग्रस्त होऊन जातें, अंत:करणवृति उचेबळू लागते व आपल्या भूत भविष्यन् स्थितिविषयीं नानात-हेचे कल्पनातरंग सूचून चित्तास अस्वस्थता उत्पन्न होते. त्यावेळचे प्रसंग डोळ्यानीं पाहिलेलीं माणसें हळुहळू नाहींशी होत चालली आहेत व जीं थोडीं क्वचित् आढळतात त्यांना त्या गोष्टीविषयीं स्मरण किवा भापणही नकोसें झालेले दिसतें. मागून आलेल्या स्वस्थतेच्या व आबादानीच्या काळात जन्मलेल्या पिढीचेच हृल्लीं चोहोंकडे प्राधान्य असल्यामुळे अर्थात्च त्या धामधुमीचीं नुसतीं वर्णनें वाचूनही अंगावर शहरे येतात; त्यातून तीं वर्णने विकारवश इंग्रज ग्रंथकारानीं लिहिलेली एकतर्फी व अतिशयोक्तीनें पूर्ण भरलेली असल्याकारणाने तीं वाचणारांचीं त्या वेळी घडलेल्या गोष्टीविषयीं व पुढे आलेल्या माणसांविषयीं अत्यंत कलुषित झालेली असावयाची. एकंदर धामधुमीला बड अशी संज्ञा प्राप्त झाली व नानासाहेब, तात्यासाहेब टोप, झांशीची राणी इत्यादि प्रमुख व्यक्तींस बंडखेोर, लुटारू, मरकरी अशा थोर पदव्या मिळाल्या. ज्याच्या बायकापोराची धमाभिमानाने वेडावलल्या शिपायाच्या क्रोधाझीत आहुती पडली, ज्यांची स्वत:ची जीवितें मोठ्या शर्तोंने बचावली व ज्याचे समुद्रवलयांकित राज्य क्षणाधीत नष्टप्राय होण्याच्या बेतात आलें होते, त्या इंग्रजानीं वरील प्रकारची पुष्पवृष्टि करून कोपर्शाति करून घेतली तर नवल नाहीं, व त्याबद्दल त्याना फारसा दोषही देतां येणार नाही.पण आमच्यांतीलच शहाणपणाचा व नि:पक्षपातित्वाचा टॅभा मिरविणाया ग्रंथकारानीं इंग्रज ग्रंथकारावर सर्वस्वी भिस्त ठेवून स्वज्ञातीयासच चेोर, दरवडेखेोरांपेक्षाही दुष्ट ठरविण्याचा प्रयत्न करावा यापरती गर्हणीय व हानिकारक गोष्ट ती कोणती ? बंड व्हावयाचे ते होऊन गेले, त्या भयंकर नाटकांत रंगभूमीवर आलेली पालें आपली इहलेोकींची थोडीशी इतिकर्तव्यता संपवून नेपथ्यांतर्गत झाली, व सार्वभौम ब्रिटिशसत्ता हालवून खुटा बळकट केल्याप्रमाणे आधिकच चिरस्थायी झाली. असें असतां तत्कालिन पुरुषांची अवास्तव निंदा करून त्यांच्या वंशजाच्या दु:खावर डाग देण्यांत व त्यांच्या देशबांधवास खालीं पहावयास लाव

  • ( ता. ७ मे १८९५ )