पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/191

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७६ लो० टिळकांचे केसरीतील लेख स्फुटसूचना रा. ब. रानडे व डॉ. भाडारकर यांच्या लेखांचा व उत्तराचा सारांश आणि त्यावरील आमचे विचार हे गेल्या खेपेस आम्ही दिलेच आहेत. या वादांत याहून आतां काहीं जास्त लिहिण्यासारखे राहिलें नाहीं, तथापि रा. ब. रानडे यानीं डॉ. भाडारकर यांच्या उत्तरास जे प्रत्युत्तर दिले आहे तें त्या वेळी प्रसिद्ध झाले नस ल्यामुळे आज त्याचे येथे थोडेसे विवेचन करणें जरूर आहे. रा. ब. रानडे यानीं आपल्या उत्तरात प्रथमतः डॉ. भांडारकर यांच्या विद्वतेबद्दल जी पूज्य बुद्धि प्रगट केली आहे त्यामुळे त्यानीं डाँ, भाडारकर याचीं उत्तरें कबूल केली असा कित्यकांचा समज होण्याचा संभव आहे; परतु रा, ब. रानडे याचे प्रत्युत्तर जरा लक्षपूर्वक वाचले असता हा समज चुकीचा आहे असे कोणासही कळून येईल. रा. ब, रानडे व डॉ. भांडारकर हे देोघेही विद्वान असून ते एकमेकास मोठा मान देतात हे खरें आहे, पण त्यामुळे प्रस्तुत विषयासबंधाने त्यांचा ज्या बाबतीत मतभेद व मतैक्य आहे त्या बाबी आता नाहीशा झाल्या असे म्हणता येणार नाहीं. रा, ब. रानडे हे आपल्या प्रत्युत्तरात असें स्पष्ट म्हणतात की, “ आम्हीं दिलेले अांकडे व त्यावरून निघणारीं अनुमानें हीं खोडून टाकण्याचा अद्याप कोणी प्रयत्न केला नाही. ' म्हणजे अर्थातच डॉ. भाडारकर यानीं ती खोडलीं नाहीत असें रा. ब, रानडे याचे म्हणणे आहे व तें अगदीं बरोबर आहे. दारिद्रय, अवघड अभ्यासक्रम, आणि वाईट सामाजिक चालीरीती या तीन कारणापैकी अकालमृत्यु होण्यास कोणते कारण अधिक बलवत्तर आहे हाच वादाचा मुख्य मुद्दा आहे. डॉ. भाडारकर तिसरे कारण प्रमुख मानतात आणि रा. ब. रानडे पहिल्या दोहोंस विशेष महत्त्व देतात, एवढाच काय तो या दोन्ही विद्वानांच्या मतातील भेद आहे. व हा भद एकाच विषयाचे दोन निरनिराळ्या दृष्टीने परीक्षण केल्याने उत्पन्न होती असे रा. ब. रानडे यानी आपल्या प्रत्युत्तरात लिहिले आह. हिंदुलोकाच्या रीतीभातींत सुधारणा केली पाहिजे हें मत रा. ब. रानडे यांस ग्राह्य नाहींसें नाहीं. तेही डॉ. भांडारकर याजप्रमाणेच सुधारणेच्छु आहेत; पण ग्रॅज्युएट अकालीं कां मरतात याचा विचार करतेवेळी * तुम्ही चांगले अन्न खात जा ’-असें विद्याथ्यांना सागण्यात कांहीं अर्थ नाहीं असें रा० ब० रानडे यांचे म्हणणे आहे; व गुजराथी आणि दक्षिणी याचा व्यायाम व आहार सारखाच असता दक्षिणीच अधिक का मरावे हा प्रश्न रा ० ब० विशेष महत्त्वाचा मानतात, रा० ब० रानडे यांनीं डॉ० भाडारकर यांस * निंदक ’ व डॉ० भांडारकर यानी रा० ब० रानडे यांस * स्तुतिपाठक ’ अशीं विशेषणे दिली आहेत. व ती वाचून विश्वगुणादशतिील गधर्वद्वयाची आमच्या संस्कृतज्ञ वाचकास आठवण झाल्याखेरीज राहणार नाहीं. सदर ग्रंथात [ केसरी-ता. ८ मे १८९४ ]