Jump to content

पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

2 ली० टिळकांचे केसरीतील लेख मध्येही असेल तर मुलास हटकून प्राप्त झाला असे समजावें. यावरून नवराबायकोची एकच प्रकृति नसणे किती आवश्यक आहे हें उघडच आहे; कारण दोघांचीही जर कदाचित् कफप्रकृतिच असेल तर मुलाना जन्मापासून अॅतकालपर्यंत खोकला, दमा इत्यादि कफविकार जडून राहतील; दोघांचीही वातुल प्रकृति असल्यास ती मुलांमध्ये फार वृद्धिंगत होईल, व उभयतांत पित्ताधिक्य असल्यास मुलामध्ये पित्तप्रकोप अतोनात होईल. आईबापापैकी एकालाच जरी मूळव्याध, उन्माद किंवा कुष्टविकार असला तरी मुलापैकी एकाला तरी तो बहुधा प्राप्त झाल्यावांचून राहात नाहींच, मग ते विकार जर उभयतांना असतील तर काय दशा हेोईल तें सागावयासच नको. एकाच घराण्यांतील मनुष्याची प्रकृति बहुधा एकाच तन्हेची असते.कारण, ती एकाच मूळपुरुषाची संतति असल्यामुळे व त्यांचे आहारविहार बहुधा सारखे असल्यामुळे, मृळपुरुषाच्याच प्रकृतीची प्रतिमा कमीजास्त प्रमाणाने सर्वात उतरली असते. मूळ प्रकृति, मूळ स्वभाव व मूळ रचना याचा वंशपरंपरेनें थोड्याबहुत प्रमाणानें चालू राहण्याचा जो धर्म तो इतका स्थिर आहे की, हजारों पिढ्यानंतर देखील तो आपले अस्तित्व थोडेसें तरी प्रकट केल्यावांचून राहात नाहीं. ही गोष्ट आमच्या विचारी पूर्वजांच्या मनांत पूर्णपणें बिंबली असल्यामुळे मनुयाज्ञवल्क्यादि स्मृतिकारानीं लग्नाच्या बाबतींत पहिला नियम असा कठीण घालून ठेविला आहे कीं, ज्या स्रीशी आपल्यास विवाह करावयाचा असेल ती आपल्याशी सपिड नसावी. एवढेच नव्हे, तर ती आपल्या गोत्रांतील देखील नसावी. लग्नसंबंधीं इतर नियम कदाचित् टाकतां येतील, व कारणपरत्वें लोक त्याचा अतिक्रम करितात, परंतु इा नियम अगदींच अलंघनीय आहे. पाहा, काहीं काही प्रसंगी आपल्या पूर्वजाचे विचार किती सूक्ष्म असत ! जामदग्न्य गोत्राचे जितके लोक आज आढळतात, तितके सर जमदग्निऋषीच्या वंशांतले. हें द्वापारयुगांतील नातें जें आजपर्यंत आम्ही पाळीत आले आहों, तें या मन्वादिकांच्या कठीण वाक्यामुळे; व हा कठीण नियम वर सागितलेल्या शारीरसंबंधीं माहितीनें त्यानी स्थापिला आहे. असो, यावरून एवढेच लक्षांत आणिले पाहिजे की, एकाच प्रकृतीच्या वधूवराची गाठ जेणेकरून पडणार नाही, असा एक उपाय आपल्या समजुतीप्रमाणें पुरातन ऋषींनी शोधून काढिला. ज्याप्रमाणे एकाच घराण्यांतील मनुष्याची प्रकृति बहुधा सारखी असते, त्याचप्रमाणे एकाच देशातील लोकाच्या प्रकृतींमध्ये हृवा, पाणी, आहार, विहार यांच्या समानतेमुळे एकप्रकारचे साम्य असते. उदाहरणार्थ, उत्तर हिंदुस्थानांतील भय्ये लोकाची तापट पित्तप्रकृति, कोंकणांतील लोकाची सौम्य व कफप्रकृति, मावळे लोकाची तीव्र व वातप्रकृति इ०. तसेच रत्नागिरीकडच्या कोकणस्थांच्या बायकाचे घारे, पिचके व अधू डोळे, कारवार प्रातांतील फिकट चेहरे, इत्यादि उदाहरणांवरून तद्देशीय लेाकाचे प्रकृतिवैलक्षण्य सिद्ध होते. हें जर खरे आहे, तर एकाच कुलांतील लोकांचा परस्पर विवाह झाल्याने एकाच प्रकृतीचा मेळ मिळून ती प्रकृति संतती