पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/185

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

{৩ o लो० टिळकांचे केसरीतील लेख

  • डॉ. भांडारकर आणि ऑनरे. रावबहादुर रानडे.

डेॉ. भांडारकर यानीं युनिव्हर्सिटीचे व्हाइस चेन्सलर या नात्यानें केललें भाषण आणि रावबहादुर रानड याचे त्यांतील दोन मुद्दयाच्या गोष्टीसंबंधानें विचार हे कसरतूिन प्रसिद्ध झालेच आहेत. रावबहादुर रानडे यानी डॉक्टरसाहेबांच्या मताचे जे खेडण केलें त्यावर डॉ. भांडारकर याचे कांहीं तरी प्रत्युत्तर येईल असें आम्हांस वाटत होतेंच व ते काय येते ते पाहण्याकडे पुष्कळाचे डोळे लागले होते. सदर उत्तर गेल्या आठवडयात इंग्रजी पत्रातून प्रसिद्ध झाले आहे. व ज्या अर्थी या वादातील दोन्ही लेखाचा आम्ही पूर्वी सारांश देऊन परीक्षण केले आहे, त्याअर्थी डॅॉ. भाडारकर यांच्या प्रत्युत्तराचाही आज येथे थोडासा विचार आम्हास केला पाहिजे. डॉ. भांडारकर याच्या प्रत्युत्तराचे दोन भाग करता येतील. एक प्रस्तुत व दुसरा अप्रस्तुत. * ग्रॅज्युएट लोक अकालीं का मरतात ? हा मुख्य प्रश्न आहे व सार्वजनिकदृष्टया याचा खल होईल तितका चागलाच. * वादे वादे जायते तत्त्वबोधः ? असें एक जुने वचन आहे, त्याप्रमाणें पाहिलें म्हणजे या महत्त्वाच्या प्रश्नाचा जर काही निकाल लावणे असेल तर वादानेंच लागेल. डॅ.भांडारकरांच्या उत्तरांतील दुसरा विषय म्हटला म्हणजे त्याच्यावर रा. ब. रानडे यानीं केलला आत्मनिंदना व नैराश्यवादित्वाचा आक्षेप हा होय हा मुद्दा जरासा व्यक्तिविषयक असून अप्रस्तुत आहे सबब पहिल्यानें मुख्य मुद्याचा विचार करून नंतर या दुस-या मुद्दयाकडे वळू. डॉ. भाडारकर व रा. व. रानडे यानी प्रकृत विषयासंबंधानें काय मतें आहेत हें आम्ही पूर्वी सांगितलेंच आहे. तथापि आज प्रसंगानुसार त्याची थोडीशी पुनरावृति केली पाहिजे. डॉ. भाडारकर यानीं इ. स. १८६२ पासून सन १८८० पर्यत युनिव्हर्सिटीची पदवी घेतलेल्या लोकांची माहिती मिळवून असे अनुमान काढले होते की, बी. ए. झालेल्या लोकांत पाशी शेकडा १६, गुजराथी शैकडा २० आणि दक्षिणी शेकडा २२ मरतात; व दक्षिणी व गुजराथी लोकामधील मृत्यूचे प्रमाण पार्शी लोकापेक्षां अधिक असण्यास आहारविहार आणि विवाह या तीन गोष्टींमध्यॆ पाशीं लोकाच्या चालीरीतींत असलेले महदंतर हें कारण होय. पार्शी लोक पैौष्टिक अन्न खातात, व्यायाम करतात आणि उशिरा लग्न लावतात. यामुळे ते जास्त जगतात असें डॉक्टसाहेबाचे म्हणणें होतें; व सामाजिक सुधारणा केल्याखेरीज तुमचा निभाव लागणार नाही असाही त्यानीं हिंदूस उपदश केला होता. रा. ब. रानडे हेही सामाजिक सुधारकच आहेत, परंतु त्यास डॉक्टरसाहबाचा वरील सिद्धान्त यथार्थ वाटला नाहीं. डॅक्टरसाहेबांनी पाशीं लोकांत विवाह व व्यायाम यासंबंधानें ज्या चालीरीती आहेत म्हणून सागितले त्या गेल्या पंधरा

  • केसरी ता. १ मे १८९४.