पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६४ लो० टिळकांचे केसरींतील लेख अनुमान जर बरोबर धरिले तर पाशांपेक्षां गुजराथी लोकांतही मृत्यूचे प्रमाण अधिक असावयास पाहिजे. कारण गुजराथी लोकांचे आहारविहार हे आमच्याप्रमाणेच पाशाहून भिन्न आहेत, परंतु ज्याअर्थी पार्शी आणि गुजराथी या दोन्ही जातींत मृत्यूचे प्रमाण जवळ जवळ सारखेच आहे असें आकडयांनीं सिद्ध होतें, त्याअर्थी डॅॉक्टरसाहेबाची कल्पना सोडून देऊन आहारविहार-विवाहादि स्थितीतील वैषम्यापेक्षां दुसरे कांहीं तरी कारण शेोधून काढणे जरूर आहे.दक्षिणी,पाशी आणि गुजराथी यांच्या सामान्य म्हणजे एकदर समाजांत [ मग ते शिकलेले असोत वा नसोत ] जें मृत्यूचे मान आढळून येतें त्यावरूनही डॉक्टरसाहेबांची कल्पना निराधार ठरते. रा. ब. रानडे यांनीं असें दाखविलें आहे कीं, मुंबई शहरांत गेल्या पधरा वर्षात ब्राह्मण हजारी २२ व पाशीं हजारी २० मयत झाले; व सन १८९३ सालीं तर दोघांचेही प्रमाण हजारी २३ च होतें, पाशींच्या आहारादिकामुळे जर ते अधिक दीर्घायु झाले असते तर वर दिलेलीं सामान्यप्रमाणें सारखीं राहिली नसतीं, यावरून व गुजराथी व पार्शी पदवीधरांत जे मृत्यूचे सारखेच प्रमाण आढळून येतें त्यावरून डॅॉक्टरसाहेबांची कल्पना अॉकडयांशी जुळत नाही असे म्हणणें भाग पडतें खेरीज पाशीं लोकांमध्यें व्यायामशाळा वगैरे व्यायाम घेण्याच्या सोयी गेल्या दहा पंधरावर्षीतच निघालेल्या आहेत, तेव्हां त्यामुळे आयुष्यमर्यादेंत कांहीं फेर झाला असल्यास तो ह्याच्यापुढे नजरस यावयाचा गेल्या तीस वर्षांतील ग्रंज्युएटच्या मृत्यूचे मान त्यामुळे कमीजास्त होण्याचा संभव नाहीं, परंतु डॉक्टरसाहेबाची कल्पना अग्राह्य धरिली तरी दक्षिणी मॅज्युएट गुजराथी अगर पार्शी ग्रॅज्युएटापेक्षा अकाली अधिक मरतात ही गोष्ट जर आकडयांनीं सिद्ध आहे तर तिचे कारण काय ह्याचे काहीं तरी आपणास सयुक्तिक उत्तर दिले पाहिजे. पाशी लोक अधिक चांगले अन्न खातात हें खरं कारण नाहीं असें वर दिलेल्या हकीकतीवरून उघड दिसून येतें; व विशेषतः गुजराथी व पाशीं ग्रॅज्युएट यांच्यामध्ये ज्याअर्थी मृत्यूचें मान समसमानच आहे त्याअर्थ डॉक्टरसाहेबांचा सिद्धान्त चुकीचा आहे असें निर्विवाद सिद्ध होतें. परंतु अमुक एक कल्पना चुकीची ठरली म्हणून तेवढयार्नेच आपलें समाधान करून घेऊन उपयोगी नाही. मराठे लोक गुजराथी लोकांपेक्षा शरीरार्ने आणि मनानें अधिक कंटक व सशक्त आहेत. युनिब्हर्सिटीच्या पदव्या मिळविण्यात, शैकडा ५० म्हणजे त्यांचा पहिला नंबर आहे; व ग्रंथकर्तृत्वाच्या मानानेंही त्यानी जितकें काम केलें आहे तितके दुस-या कोणींच केले नाहीं. अशा स्थितीत आमच्या गुर्जर राष्ट्रीय बंधूपेक्षा आमच्याकडील विद्वान् लोक अकालों का मरावेत हा मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचे रा. ब. रानडे यानीं आपल्या व्याख्यानांत जें उत्तर दिलें आहे तेंच डॅक्टिरसाहेबांच्या कल्पनेपेक्षां एकंदर्रात अधिक