पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५६ लो० टिळकांचे केसरींतील लेख झाली असती याची आपणांस सहज कल्पना करता येईल; येथील लोकांस प्राच्य विद्या शिकवाव्या किंवा पाश्चिमात्य विद्या शिकवाव्या याबद्दल सन १८३३ सालीं जो मोठा वाद झाला व ज्या वादांत मकीलेसाहेबानीं एक सणसणीत व जेोरदार मिनिट लिहून सर्व हिंदुस्थानच्या रहिवाशास पाश्चिमात्य विद्यांचे इंग्रजीतूनच शिक्षण द्याव असे प्रतिपादन केले, त्या वादाचा निकाल केवळ इंग्रजी भाषेच्यातर्फेच स्वराज्य कायम असतें तर आम्ही केला असता असें आम्हास वाटत नाहीं. मेकलेिसाहेबांनी आपल्या मिनिटांत ज्या मुद्दयावर विशेष जोर दिला आहे त्यांचा इग्रजी भाषेशी म्हणजे विशेष संबध आहे असे तें मिनिट अगदीं वरवर वाचणाच्यासही वाटणार नाही. सन १८३३ सालापेक्षा हिदुस्थानातील जुन्या विद्याचे व शास्राचे महत्त्व हल्ली लोकास जास्त कळू लागले असून कांहीं बाबतीत तरी आम्हास पाश्चिमात्य लोकापासून काहीं विशेष फायदा होण्याचा सभव नाहीं असें हल्ली युरोपियन लोकाचेही मत झाले आहे. परंतु हा प्रकार तूर्त लक्षांत न घेतां व पाश्चिमात्य ज्ञान इकडील ज्ञानापक्षी सर्वाशीं श्रेष्ठ आहे असें जरी कबूल केलें तरी ते ज्ञान देशी भाषाच्याद्वारें आम्हास देण्यास कोणची हरकत होती ? ‘कोर्टात', * हपिसात ' ' रिपोर्टात ’, ‘ कॉलेजात ’ आणि ‘ रेल्वेत ? मराठीनें किंवा दुसच्या कोणच्याही देशभाषेर्ने निर्वाह करता आला नसता असें नाहीं परतु आमचे राज्यकर्ते परकीय पडल्यामुळे त्यांच्या राज्यव्यवस्थेच्या सीकयीकरिता हिमालयापासून तो केपकुमारीपर्यंत सर्वत्र राज्यकारभार इग्रजीत चालू केला व आम्ही ताबेदार पडल्यामुळे आम्हांस ही गोष्ट अमलात आलेली हळूहळू बरी वाटू लागली. सवै हिंदुस्थान देशातील निरानराळ्या प्रातातल्या लोकाचे दळणवळण वाढण्यास व राष्ट्रीय सभेसारख्या संस्था उत्पन्न होण्यास आणि चालविण्यास मेकॉलेसाहेबाच्या मिनिटानें प्रचारांत आलल्या इग्रजी भाषेने पुष्कळ साहाय्य झाले ब होत आहे ही गोष्ट उघड आहे. पण एकाचा लाभ तर दुस-याचा तेोटा या न्यायानें आम्हांस जो हा फायदा मिळाला त्याचा वचपा देशी भाषावर निघून त्या हळूहळू मागे पडत चालल्या आहेत. व सर्वत्र व्यवहार इंग्रजीत चालू लागल्यामुळे देशी भाषेत केोणी उत्तम ग्रंथ लिहीत नाहीत, व्याख्यानं देत नाहींत व भाषणेही करीत नाहीत. ही स्थिति सुधारून युरोपातील भाषाप्रमाणे देशी भाषाची सुधारणा होण्यास केोणते उपाय करावे इकडे किलेक लोकाचे लक्ष लागले आहे ही मोठया सुदैवाची गोष्ट आहे. पण वर सांगितल्याप्रमाणे या विषयाचा विचार करिताना आमच्यावर परकीय लोकाचे राज्य आहे ही गोष्ट जितक्या रीतीनें लक्षात ठेवावयास पाहिजे तितकी ठेविली जात नाही असे कित्येक प्रसगी दिसून येतें; ही गोष्ट आज विशेष रीतीनें सागण्याचे कारण इतकेच की, देशी भाषास सरकारकडून अगर युनिव्हर्सिटीकडून किती मदत मिळणे शक्य आहे हें पुरंतैपणीं वाचकाच्या लक्षांत यावें. युनिव्हर्सिटीची व्यवस्था बहुतक युरोपियन लोकांच्याच हातात आहे असे म्हटले तरी चालेल. करिता राज्यकारभाराचे धोरण एका बाजूस ठेवून “ सौवर्णपात्रीं