पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

देशी भाषांस उत्तेजन देण्यास युनिव्हर्सिटीनें काय केलें पाहिजे १५५ प्रो. टिंडालप्रमाणें पुष्कळ विद्वान् गृहस्थ आहेत. व डॉ. भांडारकर यांची गणना अशाचु प्रकारच्या लोकांत केली पाहिजे. आमच्या राजकीय सस्था व चळवळी यांस डॉ. साहेबांच्या उद्गारांपासून विशेष जास्त धक्का पोहोचेल अशी आम्हास काडीमात्र देखील शंका वाटत नाही, व म्हणूनच व्यक्तिस्वातंत्र्याच्या वैगरसबेधानें त्यांनीं जें आपल्या व्हाइसचान्सलराच्या भाषणात उद्गार काढल ते न काढिले असते तरी फार चागले झाले असतें, असें जरी आमचे मत आहे तरी तिकडे विशेष लक्ष न देता वरिष्ठ शिक्षणाच्या अभिमान्यानी युनिव्हर्सिटीच्या खच्या स्वरूपाबद्दल डॉ. साहेबानीं जें भाषण केल तिकडे चागलें लक्ष पुरवावें अशी त्यास आम्ही सूचना करितों. डॉ. साहेबाच्या मनाचा राजकीय बाबतीत असा का ग्रह झाला आहे याची कारणे शेोधीत बसण्यात, अगर त्याबद्दल विशेष चर्चा करीत बसण्यात आतां काहीं हसील नाहीं; कारण डॉ. साहेबाचे विचार त्यांच्या दृष्टीनें किती जरी सयुक्तिक असले तरी एकंदर समाजात असलें बीं रुजण्याचा आता फारसा संभव आहे असे दिसत नाही. देशी भाषांस उत्तेजन देण्यास युनिव्हर्सिटीनें * काय केलें पाहिजे ? गेल्या अकीं लिहिल्याप्रमाणे युनिव्हर्सिटीच्या सीनेटपुढे मराठी भाषेच्या संबंधानें जी सूचना आलेली आहे त्याच्यावर बराच वादविवाद होईल असा सभव आहे; करितां त्या विषयाचा आज आम्ही थेोडासा जास्त विचार करणार आहीं. युनिव्हर्सिटति देशी भाषाचा प्रवेश होऊन इंग्रजी, सस्कृत वगैरे प्रगल्भ भाषांच्या बरोबरीनें त्यांस स्थान मिळाल्यानें त्याचा उत्कर्ष होऊन एका प्रकारें भाषोत्कर्षाबरोबरच देशोन्नतिही होणार आहे असा पुष्कळाचा समज आहे व तो ब-याच अंशीं विचारार्हही आहे, तथापि ही सुधारणा कोणत्या उपायानें घडवून आणावो व ती किती शक्य आहे याचा जितका विचार व्हावा तितका अद्याप झालेला दिसत नाही. देशी भाषांचा उत्कर्ष होऊन इंग्रजी, संस्कृत, फ्रेंच वगैरे परिणत भाषाचा प्रौढपणा त्याच्यात यावा हें सर्वत्रांस इष्ट आहे. इतकेच नव्हे, तर देशाभिमानाचे हें एक अपरिहार्य अंगच आहे असे कोणीही कबूल करील. परंतु ही स्थिति साध्य होण्यास ज्या साधनाची अपेक्षा आहे तीं सर्व आपल्यापाशीं आहेत की नाहींत याचा विचार करूं लागले म्हणजे मन थोडेंसे उदासीन होतें. सगळ्या हिंदुस्थानचा विचार सोडून देऊन उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्र भाषेचाच आपण विचार केला तर आजपर्यंत स्वराज्य असते तर तिची काय स्थिति

  • (केसरी-तारीख ६ मार्च १८९४. )