पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५४ लो० टिळकांचे केसरीतील लेख जाची स्थिति लक्षात आणता सामान्य लोकांस झेपेल इतकेच ओझें त्याजवर टाकावें. जे बळकट व हुषार असतील त्यांनीच पुढील अभ्यासक्रम पत्करावा हेंच आम्हांस श्रेयस्कर आहे व आमच्या युनिव्हर्सिटीतील अभ्यासक्रम याहून अगदीं भिन्न आहे हें आम्ही निराळे सांगावयास नकोच. डॉ. भांडारकर याच्या भाषणांतील तिसरा मुद्दा व्यक्तीस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, लेखनस्वातंत्र्य आणि देशस्वातंत्र्य इत्यादिकांसंबंधानें होता. डॅॉक्टरसाहेबाचे या बाबतीतले विचार बरेच एकतर्फी आणि कोते अतएव अग्राह्य असल्याचे मार्गे आम्ही लिहिलेच आहे. करिता त्याची आज पुनरावृति न करिता इतकेंच सागती की, युनिव्हर्सिटी मधल्या भाषणांत डॉ. साहेबांनी हे विचार घातले नसते तर त्यावाचून काही अडलें होते असें नाहीं. समाजसुधारणा होऊन हिंदुस्थानातील सर्व जाती एकत्र झाल्याखेरीज राष्ट्रीय स्वातंत्र्याची गोष्टही बोलू नये असल्या आशयाचा उपदश आतां कोणासही रुचणार नाहीं इतकेच नव्हे, तर इतिहास दृष्टया तो कितपत यथार्थ आहे याचीही आम्हांस बळकट शंका आहे. राष्ट्रीयसभेसारख्या संस्थापासून हिंदुस्थान देशास एकराष्ट्रीयत्व येण्यास किती मदत होत आहे हें ज्यानें प्रत्यक्ष पाहिले आहे त्यास आमच्या म्हणण्यातील प्रतीति येईल. या बाबतीत मि. ह्यूम, मि. बानर्जी, मि. मेथा, मि. दादाभाई वगैरे गृहस्थांच्या उपदशास जितका मान मिळेल तितका डॅी. भाडारकर यांच्या उपदेशास मिळणार नाहीं. हें आम्ही आज उघडपणें सागावयास पाहिजे असे नाही. डॉ. साहेब विद्वान आहेत विचारी आहेत आणि पोक्त आहेत ही गोष्ट आम्हास पूर्णपणे मान्य आहे. परंतु त्याच्या प्रमाणेंच राजकीय चळवळीत पुढे असणारे गृहस्थही आम्हास पूज्य आहेत, व लोकांच्या अडचणी कोणत्या त्या निवारण्यास योग्य उपाय केले असतांही बड्याबडया सरकारी कामगाराकडून अगर आग्लोइडियन लोकांकडून अशा अडचणी येतात इत्यादि गोष्टीचा डॉ. साहेबाच्या पेक्षां आमच्या राजकीय पुढाच्यास पुष्कळ चागला प्रत्यक्ष अनुभव आहे. तेव्हां डॅी. साहेबाच्या मतापेक्षां राजकीय बाबतीत या पुढायाचेच मत सर्व लोकांनीं घेतलें पाहिजे व घेतील अशी आमची खात्री आहे. सरकारी नोकरीत ज्यानीं आपलें आयुष्य घालविलें आहे, ज्यास सामान्य लोकात मिळून त्यांच्याशीं बरोबरीच्या नात्यानें वागण्याचा प्रसंग आलेला नाहीं, अलीकडे अलीकडे जें लेोकमत जागृत झाले आहे तत्पूर्वीच ज्याचे विचार परिपक्व होऊन ठाम झाले आहेत, व एकंदरीत कांहीं वेळ तरी स्वत:चा अधिकार, पदवी आणि विद्या विसरून स्वतंत्र रीतीनें सामान्य लोकात वागून त्याच्या बरोबर काम करण्याची ज्यास संवय नाहीं अशा लोकांस, अलीकडे व्यक्ति स्वातंत्र्याच्या आणि विचारस्वातंत्र्याच्या ज्या कल्पना वाढत चालल्या आहेत त्या अगदीं गैरवाजवी आणि टारगेपणाच्या वाटाव्या ह्यांत कांहीं आश्वथे मानण्यासारखी गोष्ट नाहीं. इंग्लंडात व युरोपांतही नुकत्याच निवर्तलेल्या