पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५० ली० टिळकांचे केसरींतील लेख आहे. असला अपूर्व समारंभ आपल्या कारकीर्दीत झाला याबद्दल आपणांस फार आनंद होतो असे गव्हर्नरसाहेबानीं डॉ. भाडारकर याच्या भाषणानतर जें थोडेसें भाषण केले त्यांत स्पष्टपणे बोलून दाखविले आहे. ह्या असल्या अपूर्व समारभाच्या वेळीं नेटिव्ह व्हाइसचान्सलरांचे कसें काय भापण हेोर्ते इकड सर्वोचे लक्ष लागले होते; व डॉ. भाडारकर याचे ज्यानीं ज्यानीं भाषण वाचले असल त्यास तें या अपूर्व समारंभास पूर्णपणें शोभण्यासारखे होतें, असे वाटल्यावाचून राहणार नाही. डॉ. साहेबाची सर्व मर्त आम्हास ग्राह्य वाटत नाहील हे अाम्ही येथे नव्यान सागावयास पाहिजे असे नाही. त्यांच्या भापणावर आज जी टीका करणार आहे त्याच्यावरून अामचा व त्थाचा मतभेद स्पष्ट कळून येईल. परतु हा कितीही मोठा असला तरी डॅॉ. भाडारकर याचे भाषण प्रसगास अनुरूप, प्रैौढ विचारांनी परिल्पुत, आणि मोठे विस्तृत व व्यापक होतें, असें म्हणण्यास आम्हास केोणतीही हरकत वाटत नाही. इतकेंच नव्हे तर डॉ. भाडारकर यानी निरनिराळ्या सामाजिक आणि राजकीय प्रश्नांसंबंधी आपले विचार निभाँडपणे लोकास कळविलें हे पाहून आम्हास फार आनंद होतो, व पुढेही दुसच्या नेटिव्ह व्हाइसचान्सलरांची भाषणें ऐकण्याचा योग असाच पुनः पुन: येवो अशी आम्ही इच्छा करितों. युनिव्हर्सिटीची स्थिति कशी असावी व ती हल्लीं कोणत्या प्रकारची आहे याबद्दल डॉ. भाडारकर यानीं जे विचार प्रदर्शित केले आहेत ते प्रत्येक वरिष्ट शिक्षणाच्या अभिमान्याने काळजीपूर्वक लक्षात ठेवण्यासारखें आहेत. निष्काम बुद्धीनें जर कोठेही लोक विद्याभ्यास करीत आले असले तर ते या देशातच होत असे आमच्या पूर्व इतिहासावरून उघड दिसून येते. युरोपातील राष्ट्र सुधारण्यापूर्वी आमचे इकडे आधिभौतिक व आध्यात्मिक शास्ने, कला, आणि विद्या हो चागली उदयास येऊन जागेोजाग अध्ययनाध्यापना करिता लहानमोठ्या सस्था सर्व देशभर स्थापन झाल्या होत्या. इंग्रजी राज्यात लोकशिक्षणाचे काम जितकें जारीनें सुरू आहे तशा प्रकार सर्व प्रजेस एकसारखे शिक्षण देण्याचे आमच्या पूर्वीचे राजाच्या अगर विद्वानाच्या मनात आले नव्हतें ही गोष्ट खरी आहे; पण हा सामान्य शिक्षणाचा प्रश्न सोडून दिला आणि वरिष्ट शिक्षणाकडे पाहिले तर पूर्वीच्या काळी ज्या विद्या व जी शास्ने परिपक्व दशेस आलीं होती त्यांत जन्माच्या जन्म घालविणार शेकडो विद्वान् लोक आमच्या देशांत असत, व मुसलमान राजाच्या भर आमदानींतही वरिष्ठ प्रतीच्या विद्यासबंधीं आमच्या मनात असणारी आस्था फारशी कमी झाली नाहीं. यावरून निष्कामबुद्धीनें विद्यार्जन करण्याची संवय नेटिव्हास युरोपियन लोकानीं शिकविली पाहिजे असे नाही; असें कोणासही दिसून येईल. परतु हल्लींची स्थिति लक्षात आणता ही आमची संवय नाहींशी होत आली अथवा ती कायम राहाण्यास जी अनुकूल साधनाची अपेक्षा आहे ती साधने हल्ली उत्तरो