पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नेटिव्ह व्हाइस चान्सलरांचे पहिलें भाषण. १४९ व थेोरपणाचा मार्ग असें आम्हास वाटतें. पण इतका विवेक असता तर आमची इतकी निकृष्टदशा कां झाली असती ? असेो, ती जेव्हां येईल तो दिवस सुदिनच समजला पाहिजे. नेटिव्ह व्हाइस चान्सलरांचे पहिलें भाषण. गेल्या मंगळवारी मुबईस युनिव्हर्सिटीच्या दिवाणखान्यात जेो ग्राज्युएट लोकांस पदवी देण्याचा समारंभ झाला तो एकप्रकारें अपूर्व असून आमच्या युनिव्हर्सिटीच्या इतिहासात विशेष रीतीनें नमूद करून ठेवण्यासारखा होता. आमच्याकडे युनिव्हर्सिटीची स्थापना होऊन आज जवळ जवळ चाळीस वर्षे झालीं, तरी व्हाइस चान्सलराची जागा गेल्या एकदोन वर्षाच्या पूर्वी कोणाही नेटिव्हास देण्यात आली नव्हती. कै. डॉ. भाऊदाजी, रावसाहेब मंडलिक वगैरे गृहस्थ ह्या मानास योग्य नव्हते असे नाहीं; पण विश्वविद्यालयाच्या व्यवस्थेचे कामही इतर राज्यव्यवस्थेप्रमाणें केवळ सरकारच्या अनुरोधार्ने चालत असल्यामुळे त्यात लोकाचा व्हावा तसा प्रवेश झाला नव्हता वास्तविक पाहता म्युनिसिपालिट्या, लोकलबोर्ड आणि कायदेकौन्सिलें याच्या पूर्वीच युनिव्हर्सिटींत लोकनियुक्त सभासद आणि कामगार जावयास पाहिजे होते. पण आमच्या दुर्दैवानें युनिव्हर्सिटीचा नंबर सर्वोच्या शेवटी लागला आहे असे दिसतें. असो; लॉर्ड हारिस याच्या कारकीर्दीत ज्या काही चागल्या गोष्टी घडून येण्याचा योग आला त्यापैकीच पहिल्या नेटिव्ह व्हाइसचान्सलराची नेमणूक ही एक होय. हा मान पहिल्यानें कै. नामदार तेलंग ह्यास मिळाला, व गुदस्ता त्याची प्रकृति चागली असती तर पहिल्या नेटिव्ह व्हाइस चन्सलराचे पहिलें भापणही त्याचेच झाले असतै; परंतु ईश्वरीसतेने तसा योग घडून आला नाही, आणि आमच्यापैकी एका मोठ्या विद्वान् आणि उच्च पदास चढलेल्या गृहस्थास मृत्यूर्ने एकेचाळिसाव्या वर्षीच ओढून नेले ! याच्या मागून पुन: व्हाइसचान्सलरची जागा नेटिव्हासच देण्यांत आली, व डॉ. भाडारकरासारख्या विद्वान् व अनुभवशीर गृहस्थाची त्या जागी नेमणूक झाली ही त्यांतल्यात्यात एक समाधानाची गोष्ट मानली पाहिजे. अशा रीतीनें एकामागून एक दोन नेटिव्ह व्हाइसचान्सलर लागोपाठ नेमले जावें हें काही अंशीं आश्चर्यकारक खरेंच, व त्याबद्दल लेॉर्ड हारिस याचे आम्ही मनापासून आभार मानितों. ह्या नेमणुका ज्याच्या हातून झाल्या त्यानींच नेटिव्ह व्हाइसचान्सलरांस आपण अध्यक्ष असताही बोलण्याची परवानगी द्यावी ही गोष्ट ओघानेंच प्राप्त झाली होती; व त्याप्रमाणे ना. गव्हर्नरसाहेबानीं वर्तन कल ही युनिव्हर्सिटीच्या इतिहासात आम्ही वर सागितल्याप्रमाणे अपूर्वच गोष्ट घडली

  • (केसरी -तारीख २७ फेब्रुवारी १८९४).