पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुनर्विवाह्र. १४ ३ नुसता अरण्यवास केल्यानें विषयवासना लय पावते असा नियम नाहीं. विषयवासना जागृत आहे तोंपर्यंत परमार्थाकडे कधीही दृष्टि लागत नाहीं हें जर्से खरें आहे, तसेच ऐहिक सुखाची हांव नाहीशी झाली असेल तर जगाशी संबंध ठेवून व घरात राहूनही परमार्थसाधन करता येतें, अशाविषयीं प्राचीन व अर्वाचीनकाळीं अनेक माहात्म्यांनी उदाहरणें घालून दिली आहेत. सार्वभौम राजाचे पौरोहित्य करीत असताही अंत:करण निर्विकार ठेवून परमार्थचिंर्तत खल पडू न देणाच्या वसिष्ठापासून तों आविंधाची चाकरी करणारा दामाजीपत किंवा शिवगुरु रामदास ह्याच्या काळापर्यंत पाशमुक्त बुद्धीनें ऐहिक व पारमार्थिक कर्तव्यें चेोख बजावून आपणांस, आपल्या कुळांस व एकदर देशास कृतार्थ करून घेणारे हजारों माहात्मे होऊन गेले अशी इतिहास साक्ष देती. राज्यशासनासारखें अगदीं व्यावहारिक स्वार्थपर काम करणाच्या क्षत्रियांनाही गुणवत्सुतरोपित श्रिय: परिणामेहि दिलीपर्वेशजा: । पदवीं तरुवल्कवाससा प्रयताः संयामिना प्रपदिरे । असाच कुलधर्म सागितला आहे. मनूनही वीस वर्षे गृहस्थाश्रम अनुभवून नंतर त्याची अपेक्षा सोडावी असा नियम घालून दिला आहे. पण ज्या हिंदुधर्माचा हा आदिम सिद्धांत त्याचाच अभिमान बाळगणारे आम्ही क्षणेोक्षणीं त्याची उपेक्षा करतीं; इतकेच नाही तर आपल्या कृतीनें व पुष्कळदा वाचेनेंही लोकास त्याच्या विरुद्ध उपदेश करतों ! मुलेंबाळे जाणतीं झाल्याबरोबर संसाराचा बोजा त्यांजवर टाकून मोकळे होणें हें प्रत्येकाचे कर्तव्य आहे, ही कल्पनाच अलीकडे लोकांच्या मनातून नहींशी झालेली दिसते. मुलगा झाला कीं सून केव्हा पाहीन, सून आली की नातवेंड केव्हां खेळवीन व नातू झाला कीं बाळ्याचे लग्न केव्हा करीन ह्या विवंचनेखालीं आम्हांला ह्या जगात येऊन दुसरीं पुष्कळ कर्तव्थे करावयाचीं आहेत हें आमच्या स्वप्नींसुद्धा येत नाही. यावज्जीव कडकडीत ब्रह्मचर्य पाळून आपल्या ब्रह्मतजाने सार्वभौमांसही नमविणारे प्राचीन ऋषि कोणीकडे, व आफ्ली व बायकापेोरांची टीचभर खळी भरण्याकरिता वर्षानुवर्षे विघर्मीं लोकाच्या सेवेंत बुटांच्या लाथा खाणारे त्याचे गोत्रज कोणीकडे ! परशुरामार्ने दान दिलेल्या पृथ्वीचाही अव्हेर करणारा कश्यप किंवा अगदीं अलीकडे शिवाजीचे राज्य शिवाजीस परत देणारा रामदास ज्या भूमीवर अवतीर्ण झाला तेथेच यत्किचित् अर्थलाभाकरितां हवीं तीं निंद्य कर्म करणारे अधम निपजू लागावेत ह्याहून आमच्या धर्माची व नीतिमतेची आणखी विटबना ती कोणती ? आमची हल्लीं अवनति झाली आहे ती हिदुधर्मामुळे नव्हे, तर धर्म अजीबात सुटल्यामुळे झाली आहे ही गोष्ट धमाभिमानी व सुधारक ह्या दोघानाही ध्यानात ठेवण्यासारखी आहे. विशेषैकरून तारुण्यांतील आपल्या सौंदर्याची प्रतिष्ठा सागणाच्या अर्धजरतीप्रमाणे अयम्हीं