पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४२ लो० टिळकांचे केसरींतील लेख किंवा आशेचे मंडण होण्यापूर्वीच शिखेचे मुंडण करणें व्यर्थ होय. व्याजो नारायण, मुद्दल नारायण, करणारे भिक्षू, गांवोगांव आहेत; पण, “ एतान्यपि तु कर्माणि संगं त्यक्त्वा फलााने च । कतैव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम् । (भ. गीता. १८-६) ह्याप्रमाणे जगांत राहूनही निष्काम बुद्धीनें सर्व व्यवहार करणारा महात्मा कचितूच आढळतो घरात राहून व लोकांमध्ये सर्व व्यवहार करून हा संन्यास साधतां येतो असें श्रीकृष्णांनीं अर्जुनास केलेल्या उपदेशावरून व अनेक ऐतिहासिक पुरुषाच्या उदाहरणांवरून स्पष्ट होतें. तीस वर्षे भरली कीं इंग्रज सरकारही आपल्या नोकरांस पेन्शन घ्यावयास लावतें; पण आमच्या संसारयात्रेपासून यमाजीभास्कराचे बोलावणें येईपर्यंत देखील आम्ही रजा घेत नाहीं. ह्या आशाळभूतपणाला काय म्हणावें ? ४० व्या वर्षी सर्वसंगपरित्याग करून भीक मागत हिंडावें अगर चाकरी वगैरे सर्व सोडून हरि-हरेि म्हणत स्वस्थ बसावें असे आम्ही म्हणत नाहीं. ‘‘ नियतस्य तु संन्यासः कर्मणेो नोपपद्यत ॥ (भग. १८-७) ह्या भगवद्वचनाप्रमाणें नियमित कर्तव्याचा त्याग करणें कधींच इष्ट होणार नाहीं. मात्र तीं करताना स्वार्थबुद्धि असू नये, परमाथांकडे दृष्टि द्यावी, व उरलेलें आयुष्य निरपेक्ष बुद्धीने लोकहितार्थ झटण्यात घालवावे इतकंच वरील विवेचनाचे तात्पर्य आहे. [ नंबर ३ ]* विवाहासबंधाने आमच्या ऋषिवयांचे काय मत आहे तें मागील खेपेस सागितले. आमरण ब्रह्मचर्याचे पालन करणे हा उत्तम पक्ष, किंचित् काल गृहस्थाश्रम अनुभवून नंतर त्यापासून परावृत्त होणे हा मध्यम पक्ष, व यावज्जीव संसारपंकांत निमग्न राहून जसा जन्म झाला तसेच यमराजाचा हुकूम येईल. तेव्हा जगांतून प्रयाण करणे हा अधम पक्ष होय, असा सर्व शास्रांचा मथितार्थ आहे. हिंदुधर्मात वैराग्यप्रवृत्तीला फाजील महत्त्व देऊन ऐहिक वस्तूंविषयीं तिरस्कार दाखविला आहे म्हणून कित्येक विधर्मी व त्याचाच सूर ओढणारे आमच्यापैकी कित्येक लोक त्यास नावें ठेवतात; पण त्यातील खरे इंगित दोघानाही समजत नसतें. संसारत्याग करून विरक्त होणे म्हणजे घरादाराला आग लावून देऊन वनचरवृत्ति धारण करणे असेच केवळ नव्हे हे त्यांच्या ध्यानात येत नाहीं.

  • (केसरी-तारीखे १५ मार्च १८९२).