पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुनर्विवाह, १४१ आहे, व तें घेतलें म्हणजे विवाहाची उत्तरमर्यादा पन्नासाच्याही अलीकडे येईल हें वरती दाखविलेंच आहे. दुस-या एका दृष्टीनें हीही मर्यादा अलीकडे येते.

    • त्रिंशद्वर्षों वहेत्कन्यां त्ह्द्यां द्वादश वार्षिकीं ?' इत्यादि मनुवचनाप्रमाणे पुरुषाचा प्रथम विवाह तिसाव्या वर्षी झाला पाहिजे. ** त्र्यष्टवर्षीऽष्ट वर्षीयां ' हा कनिष्ट पक्ष घेतला तरी तो काल २४ ठरतो आणि हल्लीं लग्ने तर बहुत करून १६-२० च्या दरम्यान होतात. मनूनं तिसापासून पन्नासांपर्यंत म्हणजे २० वर्षे गृहस्थाश्रम अनुभवण्यास परवागनी दिली आहे; तेव्हां मनुस्मृत्यनुसार ३६ पासून ४० च्या आंतच संसारत्याग करणें प्रत्येकाला हल्लीं भाग आहे. अर्थात् ४०साव्या वर्षानंतर पुनः लग्न करणारा धर्माविरुद्ध आचरण करीत असून आश्रमभंगास सांगितलेल्या प्रायश्चित्तास म्हणजे जातिभ्रंशास पात्र आहे. गृहस्थाश्रमाला उचित अग्निहोत्रादि कर्म करणारांची ही गोष्ट; मग संध्या देखील विसरून ' न हिंदुनै यवनः ' बनलेल्या अर्वाचीन मंडळीस आमच्या शास्रकारांनीं मुळींच लग्न करण्याची तरी परवानगी दिली असती कीं नाहीं हा संशयच आहे.

येणेंप्रमाणें तीसचाळिसांचे दरम्यान संसारत्याग करून परमार्थ साधनाकड लक्ष लाविलें पाहिजे. असें आमचे धर्मशास्र सांगतें, आणि जौंपर्यंत आमची धर्मबुद्धि जागृत होती, जोपर्यंत विषयोपभोग हे आयुष्यांतील इतिकर्तव्य नसून होईल तितकें लवकर संसारपाशांतून मुक्त होऊन इतर अत्यंत महत्त्वाच्या कार्यास लागावे असें पुष्कळ लोकांस वाटत होतें. तोपर्यंत वरील नियमाप्रमाणे वागून आपली निग्रहशाक्त, निरपेक्षता व धैर्य दाखविणारीं माणसें आमच्यांत निपजत होतीं असें इतिहास साक्ष देतो. ह्याप्रमाणें गृहस्थाश्रम संपवून वानप्रस्थाश्रम किंवा संन्यास स्वीकारावा असें शास्रकारांचे म्हणणें आहे. पण तसें वागणें सेोपें नाहीं, म्हणून लोकांनीं अर्थात्च तिकडे दुर्लक्ष केले; परंतु आम्हांला जर पुन्हां आपली पूर्वीची उन्नतावस्था प्राप्त करून घ्यावयाची असेल तर त्याप्रमाणें वर्तन करूं लागल्यावांचून गत्यंतर नाहीं हें उघड आहे. संन्यास शब्दानें लौकिक भगवा संन्यास मात्र घ्यावयाचा नसून खरा संन्यास म्हणजे सर्व काम्यवस्तूंचा व कमीचा परित्याग असाच अर्थ घेतला पाहिजे; व हें आम्हींच म्हणत नसून त्याला प्राचीन अधार आहे.

    • काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः ।

सर्वकर्मफल त्यागं त्यागं प्राहुर्विच क्षणाः (भ. गीता १८.२) ह्या गीतेंतील भगवद्वचनाप्रमाणें खरा संन्यास म्हणजे सर्व कामकाज सोडून गुलाबी छाट्या फडकावीत यजमानाच्या पुड्यावर पुष्ट होणें नव्हे, तर सर्व कर्मे यथेोक्त रीतीनें करीत असतांही त्यांच्या फलाची अपेक्षा न ठेवणे हा होय. मनांतील वासनारूप कषाय गेला नाहीं तोपर्यंत नुसती बाहेर कषायवस्ने परिधान करणे,