पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४० लो० टिळकांचे केसरींतील लेख परंतु आमरण ब्रह्मचर्याचे पालन करणें साधारण मनुष्याच्या हातून व्हावयाचे नाहीं. तसेच खरें वैराग्य झाले नसेल तर तें पाळण्याच्या भरीस पडू नये हेंच एकार्थी चांगले, असे समजूनच कीं काय, च्या शास्रकारांनीं दुस-या एका गौणपक्षाची योजना करून ठेविली आहे. तो हा कीं समावर्तनानंतर ग्राह्यस्थ्य स्वीकारून संसारसुखाचा पाहिजे तर अनुभव घ्यावा; परंतु खया पुरुर्थाची जेोड करावयाची असेल तर कांहीं काळानें तरी त्यापासून निवृत्त झाले पाहिजे,

    • गृह्स्थस्तु यदा पश्येद्वली पालितमात्मनः ।

अषस्य स्यैव चापत्यं तदारण्यं समाश्रयेत् । (मनु. ६-२) म्हणजे तोंडावर सुरकुत्या पडल्या, केंस पांढरे झाले, मुलेबाळे झालीं म्हणजे गृहस्थानं सर्वसंगपरित्याग करून वनांत जावें असें मनु म्हणतो. पण हल्लीं प्रकार कसा आहे बरें ? नदीवर गोवया गेल्या तरी एखाद्या अल्पवयस्क मुलीचे पाणिग्रहण करून आपल्याबरोबर चिताग्नींत नाहीं तरी वैधव्यरूप दावानलांत तिला लोटू पाहणारे नराधम सभ्य म्हणून खुशाल लोकांमध्यें मिरवितात !

    • द्वितीयमायुषो भागं कृतदारो गृहे वसेत् ”

(मनु. ५-१६९) म्हणजे अर्धे आयुष्य होईपर्यंत म्हणजे अर्थात् शिकस्त पन्नास वर्षेपर्यंत गृहस्थाश्रम ठेवून पुढे संसारत्याग करावा असे मनूचे म्हणणे आहे. ही गोष्ट अर्थात् शंभर वर्षाची आयुर्मर्यादा होती तेव्हांची झाली; पण हल्लीं ५० किंवा ६० हेंच आयुष्याचे मान झाले आहे. तेव्हां वरील मनुवचन पाळावयाचे म्हटलैं म्हणजे तिसाव्या वर्षीच्या आंतच गृहस्थाश्रम पूर्ण करणें प्रत्येकाचे कर्तव्य होत नाहीं काय ? गौतमाचेही असेच दुसरें एक वचन आहे तें अधिक स्पष्ट आहे. “ पचाशद्वर्षादुध्र्वे च न ग्राह्य पाणिपीडनम् । कलेयुगस्य दुष्टत्त्वाच्याज्य माहुर्मनीषिणः ॥ युवाने प्रेक्षयेन्नारी स्वयं जीर्णापि सर्वदा । व्याभिचारात्कुलं नशेयत् कुलनाशात्कुलांगनाः । भ्रंश्यति संकराभूत्वा संकरो नरकाय वै । नरकान्नानुवर्तेतॆ तस्माब्दृह्णन्ति । म्हणजे एक वेळ वृद्ध स्रीनें तरुणाशीं लग्न केलेले पत्करेल; पण पन्नास वर्षानंतर म्हतायानें कधीही लग्न करूं नये; कारण अशा लग्नाची स्री व्यभिचारिणी निघावयाची व मग सर्व कुलक्षय होतो. भगवद्गीतेच्या प्रथमाध्यायांत अर्जुनाचे असेंच म्हणणे आहे. तेव्हां वरील वचनांचा केवळ शब्दार्थ घेतला तरी पन्नास वर्षानंतर विवाह करणें म्हणजे अतिशय मोठे अधर्माचरण करणे असे होतें. पण तें करणारावर हल्लीं कोणी ग्रामण्य करीत नाहीं. ह्या धर्मश्रद्धेस काय म्हणार्वे ? वस्तुतः वरील वचनांचा शब्दार्थ घेण्यापेक्षां शास्रकारांचे तात्पर्य घेणेंच अधिक इष्ट