पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुनवैवाह. १३३ आमच्या लिहिण्यानें नव्याजुन्या दोन्ही पक्षांतील पुष्कळ लोकांना वाईट वाटण्याचा संभव आहे, किंबहुना ज्या पुनर्विवाहाच्या प्रचाराविषयीं आम्ही आज लिहिणार तो इतका सार्वत्रिक आणि रूढ होऊन गेलेला आहे कीं, त्याशीं कोणत्यातरी रीतीनें संबंध येऊन पोचत नाहीं असा पुरुष फारच विरळा सांपडल तेव्हां एवढ्धा मोठ्या जनसमूहाने स्वीकृत केलल्या प्रघाताला वाइट म्हणणार त्यापासून खरोखरच आमचे अतिशय अनहित हेत आहे म्हणून हें निराळे सागावयास नको. फार सहवासार्ने एखादी दुष्ट चालही मनुष्याला बरीशी वाटू लागते, व ती बंद केल्यानें थेोड्याबहुत व्यक्तींना तात्कालिक अडचण सोसावी लागत असल्यास मग तर त्या चालीचे मंडण करणारेही हवे तितके निघतात. आमच्या अॉगवळणी पडून गेलेल्या पुनर्विवाहाची तरी अशीच गोष्ट आहे. पुनर्विवाह अर्थात् सुधारक वर्गाचा अति आवडता विषय होऊन गेलेला व कृतीनें नाही तरी लेक्चरार्टिकलादिकाच्या द्वारानें तरी लोकाना परिचित झालेला बायकाचा नव्हे हें चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलेंच असेल. स्रीपुनर्विवाहाचे मंडण आजपर्यंत पुष्कळ झालें, व आणखी जरूर वाटल्यास लेखण्या पेने सज्ज आहेत; तेव्हा सर्व सुधारकांचा मक्ता घेणारानीं आपलासा करून टाकलेल्या स्रीपुनर्विवाहासारख्या भानगडीच्या विषयांत मध्येंच तोंड घालण्याची आम्हांला आज जरूर नाहीं, आणि इच्छाही पण नाही; परंतु पुरातन हिंदुधर्माचे पृथक्करण करून त्यांतील एकूण एक नासके कुसके भाग आपल्या तर्कशास्ररूपीं सूक्ष्मदर्शक यंत्राने शेोधून काढण्याचे जबरदस्त काम पत्करणाच्या कुशाग्रबुद्ध सुधारकाग्रणींच्या, व तसेच पुनर्विवाहाचे नाव काढल्याबरोबर माथे फिरून जाणाच्या व अंधपरंपरेनें प्राचीन स्मृत्यादि ग्रंथाचे गोडवे गाणा-या धर्माभिमान्याच्या लक्षांतून शास्त्रनिषिद्ध असून अलीकडे बोकळलेला हा पुरुषपुनर्विवाह कसा अजिबात गळला ह्याचे आम्हांस मोठे आश्चर्य वाटतें. अमुक वयापुढे लग्न करूं नये किंवा एक बायको असतांना दुसरी बायको करूं नये वगैरे नियम करावे असे क्वचित् निबंध ऐकू येतात खरे; पण ह्या विषयाचे खरे महत्त्व अजून कोणाच्या मनात फारसे बिंबलेले दिसत नाहीं व त्याचा विचार ही आजपर्यंत व्हावा तसा झाला नाहीं, म्हणूनच ह्या गोष्टीचा उपक्रम करण्याचे आम्हीं आज मनात आणले. चालू असलेल्या हंगामात तेथे कित्येक लमें अशी झालीं की, त्यांतील वधूवरांना, सोययाधायच्यांना व प्रेक्षकगणालाही खरोखर अतिशय लाज वाटावयाला पाहिजे होती. मे आणि डिसेंबर किवा हेमन्त वसन्ताच्या संगमाची बरोबरी करणारीं जोडपीं इंग्लंडासारख्या सुधारलेल्या देशांतही आढळतात हें आम्ही नाकबूल करीत नुाही. पैसा, पदवी, धूर्तता इत्यादिकाचे मनुष्यांच्या विकारांवर जोपर्यंत प्राबल्य चालेल तोपर्यंत * अंगंगलितं पलितं मुण्डम् ’ अशा स्थितीस पोहोचलेल्या आजोबांच्या गळ्यांत माळ घालणाच्या मुग्ध कुमारिका पुष्कळ आढळतील, व एखाद्या सुदामदेवाच्या गळ्यांत पडलेली रंभाही आढळेल आणि