पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३२ लो० टिळकांचे केसरींतील लेख जनें झोडण्यांत मंडळी गर्क झाली आहे व रिकाम्या डामडौलाकरितां शेकडें रुपयाचा फन्ना पाडीत आहेत. जणू काय पुढील साल कसें जाईल कोण जाणें. चालती घडी साधून घ्यावी, अशीच सर्वोची समजूत दिसते. ह्यापेक्षां आमच्या परदुःख शीतलतेचे, अदूरदर्शित्वाचे व वेअकलेचे आणखी दुसरें निदर्शक कोणतें पाहिजे ? आणि खरेच पंचपक्वानांनीं ढेकर देत पोटावर हात फिरवितांना, ज्यांच्या कष्टावर आपणाला फुकट खायला मिळतें त्या बिचाया शतकयांची व मजुरदारांची कशी अन्नान्नदशा झाली आहे किंवा लवकरच होण्याची भीति आली आहे, त्यांची आठवण आम्हांस कशाने येणार ! असेो. ह्या विषयाच्या संबंधानें आज आम्हांला कांहीं लिहावयाचे नाहीं, आपल्या पैशाचा हवा तसा दुरुपयोग करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. निदान कायदेशीर रीतीनें तरी त्याला कोणी प्रतिबंध करू शकणार नाहीं. शिवाय एकंदर देशाचे दारिद्य वाढण्याचा क्रम असाच आणखी कांहीं वर्षे चालू राहिल्यास लवकरच थेोडाबहुत पैसा येथे आहे तोही सरकारच्या व परकीयाच्या तिजोरीत जाऊन हल्लीं श्रीमंत व सुखवस्तु म्हणविणारांसही दरिद्यांच्या पंक्तीस बसावें लागेल आणि मग अर्थात् वरच्यासारखे अनेक वर्षे आमच्या हाडी खिळून गेलेले डोहाळे आपोआपच सुटतील, अशी स्थिति इष्ट आहे कीं नाहीं हा विचार येथे नको; कारण जेंौंपर्यं मागील ऐश्वर्याचा वृथा डौल विसरून हल्लींची आपली खरी स्थिति डोळे उघडून पाहण्यापुरती अक्कल व धैर्य आमच्यांत आली नाहीत, तीपर्यंत वरील परिणाम टाळणें आमच्या हातांतली गोष्ट नाहीं. आज आम्हांला एका निराळ्याच विषयाचा प्रस्ताव करावयाचा आहे. संमतिबिलाशीं विरोध केल्यापासून सर्व सुधारणांचा अनन्योपभेोग घेणारांनीं केसरीला आपल्या कंपूंतून हद्दपार केले व अलीकडे ग्रामण्यामुळे कांहीं धर्माभिमानी म्हणविणाच्या सदृहस्थांचीही आमच्यावर खप्पा मर्जी झाली आहे. वस्तुतः असत्य, लबाडी व ढोंग मग तीं कोठेही आढळोत. त्याचा वेळच्या वेळीं परिस्फोट करणें हें केसरीचे ब्रीद व त्याकरितांच मुख्यत्र्वेकरून त्याचा अवतार झाला आहे. परस्पर सुधारकांच्या पोकळ बडबडीचे खरें स्वरूप लोकांचुढे येणें जितकें इष्ट आहे तितकेच केवळ लब्धप्रतिष्ठितपणा मिळविण्याकरिता कामापुरंतें धर्माभिमानाचे कातडें पांघरून एरवीं यथेच्छ वागणारांची काळींबेरी बाहेर काढणें श्रेयस्कर आहे. सर्वदा एकाच पक्षाचे मंडण करावयाचे असा ज्यांचा बाणा असेल त्यानीं आपल्या बाजूवर बेतली म्हणजे हवा तसा लपंडाव करूं लागावें हें स्वाभाविकच आहे पण केसरीला कोणत्याही नव्याजुन्या पक्षातील बड्या मंडळीला खुष कर ण्याची जरूर वाटत नसल्यामुळे व आचारविचार विसंवादित्व सर्व पक्षांत सारखेच असल्यामुळे प्रसंगीं सर्वोचा रोष पत्करण्याची पाळी येते. व त्याबद्दल त्याला मुळींच वाईट वाटत नाहीं. ही गोष्ट येथे सांगण्याचे प्रयोजन हें कीं, ज्या विषयावर आज लिहिण्याचा आम्हीं संकल्प केला आहे तो अशाच प्रकारचा आहे.