पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३० लो० टिळकांचे केसरींतील लेख तेव्हां आतां कांहीं तरी पुंडाई माजवावी याखेरीज त्यांस दुसरा मार्गच राहिला नाहीं. * आमचे काय म्हणणें आहे तें त्यांत आहे ? श्रनिी काशीरामेश्वरापर्यंत जाऊन अगर शास्रार्थ आणवून निकाल करावा असे यानीं रडगाणें चालविलें आहे; जणी काय श्रीचे अधिकारीही यांच्याप्रमाणेच शास्रमूढ आहेत. श्रीचे आधिकारी यानी काशीरामेश्वराहून शास्रार्थ आणून जर निकाल करावयाचा तर येथे त्यास बोलावले तरी कशास ?

  • ...

दुसरा मुद्दा पुराव्याचा. या सबंधानेही असेच कांहीं शुष्क वाद काढले आहेत. वादीनी पुराव्यास दिलेले वर्तमानपत्रातील लेख पुराव्यास अग्राह्य आहेत असें आम्हीं लिहिलें होते, त्यावर कोणीही सयुक्तिक उत्तर दिलें नाहीं; तेव्हां त्या संबंधाने विशेष विचार करण्यास नको. तथापि जेो तो वर्तमानपत्नकार आपापल्या पक्षाच्याच गोष्टी नमूद करीत असतो. व त्याही त्यांनी प्रत्यक्ष पाहिल्या नसता या गोष्टीचे येथे आमच्या प्रतिपक्षास स्मरण दिले पाहिजे. केसरी पत्रातील लेख राजद्रोही असतात म्हणून त्यांवर बंगवासीप्रमाणें फिर्याद केली पाहिजे असे जर उद्या केोणी म्हणू लागला तर त्यास उत्तर देणें जितकें आवश्यक आहे तितकेंच गांवात कोणीही मनुष्य चहा पिणारे लोक जात मोडण्याकरतां गेले होते असें म्हणेल तर त्यास उत्तर देण अनवश्यक ठरेल. जाणून बुजून चहा घेतला ही गाष्ट कबूल आहे. जात मोडण्याकरिता चहा घेतला असे जर वादींचे म्हणणे असेल तर ते त्यास शाबीत केले पाहिजे; आणि ही शाबिती म्हणजे अर्थात् प्रतिवादीचे लेख, भाषण अगर क्रिया होत; परंतु यापैकी एकही पुरावा वादींस पुढे आणता आला नाही. त्याची भिस्त काय ती रिव्हगटण साहेबावर व था साहेबाचा हवाला गोपाळराव जेाशावर. गीळराव जेोशी साक्षीस येण्यास एका पायावर तयार असता वादी आपण होऊन त्यास साक्षी करीत नाहीत; कारण जात मोडण्याचा उद्देश सिद्ध न होता उलट याच्याच पक्षाची * अंडीं पिल्लीं ’ गोपाळराव जोशी बाहेर काढणार. अशा रीतीने वादींचा चेाहोंकडून कोडमारा झाला आहे. प्रतिवादींस जातच मोडावयाची होती तर स्वामींचा अधिकारच त्यानी कबूल केला नसता. ज्यास जात मेोडावयाची तो प्रायश्चित द्या म्हणून तरी कशास म्हणेल ? परंतु हा विरोध आग्रहाने आंधळ्या झालेल्या वादांस केोठून दिसणार ? तेव्हा गरोदर स्त्रीवरच यानीं गर्भपात केल्याचा आरोप केला आहे. प्रत्येक निषिद्धाचरण ज्ञानतः केल्यानें जर जात मोडते तर बर्फ खाणारे, सोडापिणारे, कादे भक्षण करणारे आणि व्याजबट्टयाचा व्यापार करणारे सर्वत्र ब्राह्मण लोक जातिबाह्य नाहीत काय ? कित्येक लोकांनी अशी कोटी काढली आहे की, चहा हा पदार्थच पूर्वी नव्हता, तेव्हां त्यास शास्रांत प्रायश्चितच नाहीं व म्हणून चहा पिणारे सर्व लोक जातबाह्य आहेत; परंतु या कोटिबाजास असे कळत नाहीं