पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्फुटें. १२९ पाहिजे. चहा घेतला नाहीं, तेो आमच्या हातचा नव्हता असें प्रतिवादींचे म्हणणें नाहीं. प्रतिवादीपैकीं कांहीं जणांनीं चहा घेतला ही गोष्ट पहिल्यापासूनच सर्वत्रांस माहीत आहे, व गोपाळराव जोशी यांनी आपल्या पत्रांतही त्याचा उल्लेख केला आहे. बाकी राहिलेल्या प्रतिवादीस जाणूनबुजून ब्राह्मणेतर जातीच्या हातचा चहा घेतल्याचे नाकबूल नाही. त्यांची तक्रार इतकीच आहे कीं, अशा रीतीनें चहा घेण्यास शास्त्रात ज प्रायश्चित्त निघेल तें श्रींनीं द्यावे व तें घेण्यास आपण तयार आहों, यात कोणत्याही त-हेची छपवाछपवी नसून प्रतिवादींनी आपल्याकडून सरळपणानें एकंदर प्रकार श्रींचे अधिकारी याजपुढे ठेविला आहे. वादींनाही अशाच तन्हेचे सरळ वर्तन केलें असतें तर या प्रकरणाचा एकदोन घटकंत निकाल लागला असता; परंतु डोळझांपणे लावून मुद्दाम आडरानात शिरण्यास जेव्हां मंडळी तयार झाली तेव्हां तेथे अर्थातच कोणाचा नाइलाज चालेना. अद्यापही या मंडळीचे वर्तन अशाच तच्हेचे असून त्यांस स्वतः जी गोष्ट करतां आली नाहीं ती घडवून आणण्यास चतुःशाखीय ब्रह्मवृदसभेकडून श्रीच्या आधिकायास धमकी देण्याच्या प्रयत्नांत ही मंडळी गुंतली आहे. ब्रह्मवृंदसर्भेत कोणताही वाद व्हावयाचा म्हटला म्हणजे तो शास्त्रास धरून युक्तिपूर्वक व्हावयास पाहिजे. “ प्रतिवादीच्या बापआजाचे वैश्वदेवाच्या वेळीं कच्छविसर्जन होत असे, परंतु सदर प्रतिवादी त्याप्रमाणें हल्लीं वागत नाहीं, करतां त्यास जातिबहिष्कृत करावा. यास प्रमाण: येनास्य पितरो याताः येन याताः पितामह्ाः । येन यायात् सतां मार्गे । तेन गच्छन्न दुष्यति । ?? असे जर कोणी धर्माभिमानीं म्हणविणारा ब्राह्मण आडमुठ्याप्रमाणें सर्भेत प्रतिपादन करूं लागला तर त्याची संभावना कोणत्याही शहाण्याच्या सभेत उपहासानेंच होईल हें आम्हीं सागावयास नकोच. आमचे बापआजे वेश्यागमन करीत होते किंवा पैसे खात होते म्हणून आम्हीं तसे करण्यास काहीं हरकत नाहीं; परंतु ते चहा पीत नव्हते म्हणून आम्ही चहा प्यालें तर मात्र जातिबाह्य होऊं हें एखाद्या निरक्षर शूद्राने म्हटलें असता शोभल. प्रस्तुत प्रकरणांतील वादीच्या पक्षास असला कोटीक्रम सर्वथैव अलाघ्य आहे. ब्राह्मणेतर लोकांच्या हातचा चहा घेतला असतां अगर अन्नग्रहण केलें असतां शास्रांत काय प्रायश्चित्त आहे हें पाहून जेो न्याय होईल तोच खरा व त्यापासूनच खरें धर्मसंरक्षण होईल. वादीस धर्मशास्त्र माहीत नसले तर त्यांनीं या प्रकरणाचा निकाल श्रीचे अधिकारी शास्रीद्वय याजवर सौपवावयाचा होता, परंतु अशा रीतीनें सरळपणाचा व्यवहारच त्यांस कर्तव्य नाहीं. ब्राह्मणेतराच्या हातचे उदक किंवा अन्नग्रहण केलें असतां शास्राप्रमाणें किती दोष येतो हें यास माहीत नाहीं अगर घेण्याची नाहीं; व श्रीच्या आधिकाच्यावरही यांचा विश्वास बसत नाहीं; व १६