पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२८ लो० टिळकांचे केसरींतील लेख परंतु धर्माभिमानी लोकांनींच जेव्हां अशा त-हेचे वर्तन करण्यास आरंभ केला तेव्हां धमीपेक्षां आग्रहानें व दुरभिमानानेंच या लोकांस जास्त ग्रासलें आहे असे उघड दिसून आले. असेो. पुरावा सभेत वाचून दाखवावयाचा नाही असें ठरल्यावर याच शें-दीडशें लोकांनीं श्रीच्या अधिकाच्यापुढे चाललेल्या खटल्याची भवति न भवति करण्यास सुरवात केली. पुरावा काहींही असला तरी योग्य निकाल झाला पाहिजे असे कित्येकांचे प्रलाप निघाले; कित्येक स्वामी काय हवा तो निकाल करोत आमची जातगंगा ज्यास पुनीत करील तेच शुद्ध होतील असें आडमुठयासारखे बरळू लागले; आणि कित्येकानीं तर कांहींही होवो, आम्ही आपल्या बाप आजांचा धर्म सोडणार नाहीं असें निक्षून सांगितलें. अखेरीस सर्वानुमतें असा ठराव झाला कीं, आपली सर्व हकीकत डेप्युटेशन-( हा प्रकार स्मृतींतून किंवा आमच्या बापआजाच्या तोंडातून निघालेला आढळत नाहीं !) मार्फत श्रींस कळवावी व आपल्या मताप्रमाणें श्रींस निकाल करण्यास सल्ला द्यावी. नंतर सभा बरखास्त झाली व श्रीचे अधिकारी सुधारकांस फितले आहेत अशा रीतीची मूखै बडबड करीत प्रायः एकशाखेचाच पाला घरोघर उडून गेला. नंतर दोन दिवसानीं रंगशास्त्र्यादि पुरस्सर १०-१२ मंडळी सभेचे हेतु श्रीच्या आधिकाच्यास कळविण्यास त्याजकडे गेली. त्यावेळी तेथे प्रतिपक्षाचा एकदोन मंडळी हजर होती. त्यानीं सभेची हकीकत श्रीच्या अधिका-यास कळवून अशी विनंति केली कीं, वादीप्रतिवादीचा खटला श्रीपुढे यथाशास्त्र चालू असून त्याचा निकाल करण्यास श्रीस पूर्ण अधिकार आहे व श्रीचा निकाल सर्वांनी शिरसामान्य केला पाहिजे ! असे असता हे त्रयस्थ म्हणून अव्यापारेषु व्यापार करणारे गृहस्थ मध्येंच आमचे काही ऐकून घ्या असें जर म्हणत असतील तर निदान त्यांस काय सांगावयाचे असेल तें त्यानीं वादीप्रतिवादीसमक्ष तरी सांगितले पाहिजे. न्यायाधिशाकडे जाऊन वादीप्रतिवादीतर्फे एखादी गोष्ट गुप्त रीतीनें त्याच्या कानात सागणे सर्वथैव निद्य आहे. डेप्युटशनच्या गृहस्थांस ग्रामण्य प्रकरणातील वादीचा पक्ष अपुरा पडला असे वाटत असल तर त्यानीं तो पक्ष पुरा करण्यास पाहिजे तर वादीस मदत करावी; परंतु दोघांचा न्याय चालत असतां अनाहुत मध्येच तोंड घालून त्रयस्थाचे कातडें पाघरून काही घोंटाळा करणें अगदीं रास्त नाही. प्रतिपक्षाची अशी तक्रार झाल्यामुळे डेप्युटेशन पुन: केव्हां तरी येऊन एकातीं गांठू असे म्हणून निरुत्तर होत्साते निघून गेले. येणेंप्रमाणें चतु:शाखीय ब्रह्मवृंदसभेचा चतुरहेिक इतिहास आटपल,. आता गेल्या खेपेस ग्रामण्यासंबंधाने आम्हीं ज्या गोष्टी लिहिल्या होत्या त्यावर कित्येकानी दोन तीन आक्षप काढले आहेत त्यांचा विचार करूं, प्रथमत: प्रतिवादीसंबंधानें जो विनाकारण गैरसमज करण्याचा प्रयत्न केला आहे तो द्र केला