ੋਟੋ, १२७ وخه स्फुट% ग्रामण्य. ग्रामण्यासंबंधार्ने मागील अंकी आमचा लेख लिहून गेल्यानंतर येथील चतु:शाखीय ब्रह्मवृंदांची दोन खटपटी गृहस्थानीं सभा बोलाविली होती. सुमारें १००० लोकास निमंत्रण केले असून सभेस दोनप्रहरीं दोन वाजता सुरवात होणार होती; परंतु दोहोंचे तीन झाले, तिहींचे चार झाले तरी सभासद मंडळी कोठेच दिसना ! अखेरीस अगदीं सायंकाळीं चार शाखांच्या ऐवजीं एकाच शाखेचा पाला गोळा झाला आणि पेोलिसाच्या पाहाच्याखालीं सभेच्या कामास सुरवात झाली ! सर्भेत जमलेल्या लेोकांची एकंदर लोकसंख्या एक शतकापासून सार्धशतकापर्यंत कमजास्त होत होती ! निमंत्रण पत्रिकेत हल्लींच्या ग्रामण्यप्रकरणातील श्रीच्या अधिकाच्यांपुढे ग्रामण्यात झालेला पुरावा वाचून दाखविण्याकरिता वगैरे कामासाठीं सभा बोलाविली होती; परंतु पुरावा ग्राह्य कोणता ठरला हें ठाऊक नसल्यामुळे म्हणा अगर दुस-या कोठे तरी मक्षिकापात झाल्याने म्हणा, सभेपुढे पुरावा वाचण्याचे काम निघालें नाहीं. कोणत्याही कारणानें का होईना; पण झाली ही गोष्ट शहाणपणाची झाली; व अशाच रीतीनें दुसरीही कार्मे पार पडलीं असतीं तर या चतुःशाखीय ब्रह्मवृंदसभेबद्दल आम्हांस कांहीं कमी जास्त लिहिण्याचे कारण घडलें नसलें. पण श्रींच्या आधिकाच्यांसमेरि वादीप्रतिवादीच्या अभियोगांत झालेला पुरावा कोणत्या तरी सभेपुढे यथेच्छ वाचीत बसण्याचे साहस ज्याप्रमाणे सभासदांनी करण्याचे नाकारलें त्याचप्रमाणे इतर गोष्टीतही त्यानीं आपल्या मनाची समदृष्टता न ठेवल्यामुळे त्याच्या पुढील वर्तनाबद्दल दोन शब्द लिहिणें जरूर आहे; व त्याबद्दल ब्रह्मवृंदाची माफी मागून आमचे म्हणणे सादर करतों. श्रीजगद्गुरु शंकराचार्य हे सर्व शाखाचे प्रमुख धर्माधिकारी आहेत. याबद्दल निदान धर्माभिमानी म्हणविणा-या लोकांत तरी शंका अगर अन्यथा ग्रह असू नये. श्रीपुढे अगर त्यांच्या अधिकायापुढे जर एखादा खटला चालत असला तर त्याचा निकाल होईपर्यंत अर्थातच धर्मगुरूंचा आधकार श्रीकडे ज्यानी सोपविला आहे त्यांनी स्वस्थ बसले पाहिजे. श्रीच्यापुढे चाललेल्या खटल्यांतील पुराव्याचा त्रयस्थ सभासदानी (त्रयस्थ म्हणजे तिठयावरील लोक असा अर्थ करण्याची पाळी येणार आहे) स्वतंत्र रीतीनें विचार करणे व अमुक पुरावा ग्राह्य आहे अमुक पुराव्यावरून अमुक गोष्ट सिद्ध झालीच पाहिजे असें श्रीस कळविणें म्हणजे श्रीच्या गादीचा उपमर्द करण्यासारखेंच होय. चहा पिणाच्या लोकाकडून अशा तन्हेचे वर्तन घडले असतें तर त्यास कांहीं तरी सबब सागता आली असती;
- केसरी ता. १ मार्च १८९२.