पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२६ लो० टिळकांचे केसरींतील लेख असें जरी आम्ही अनेकवार सांगितले तरी वेदातविचार हें सर्व धर्माचे मूल आहे अशी प्रत्येकाची समजूत आहे. अमच्यामध्यें कितीही बरवाईट पंथ असले तरी सर्व नद्या सागरांत ज्याप्रमाणें एकवट होतात त्याप्रमाणे हे सर्व पंथ ईश्वराकडच नेणारे आहेत अशी आमची समजूत आहे, जगातील दुस-या कोणत्याही धर्मोत इतकी उदारता अगर समजसपणा दृष्टीस पडावयाचा नाहीं. कोणी ईश्वराचा जगांमध्ये एकच अवतार झाला आहे असे मानतात; व केोणी मूर्तिपूजा सोडून देऊन निर्गुण परमेश्वरार्च ध्यान करण्याचा आव घालतात परंतु आपल्या आचर. णानें मूत्यूंपासक जितके आग्रही असतात तितकेंच निर्गुणोपासक असताही आपण आहो असें लोकांस दाखवितात. कोणताही धर्म ध्या. त्यांतील धर्म ग्रंथांत नीति तत्त्वांची सरमिसळ असावयाचीच, मग ती कोर्ट जास्ती असेल, कीटें कमी असेल. तात्पर्य या निव्वळ धर्म तत्त्वाचे इतर असारभूत गोष्ठीपासून पृथक्करण करून सदर तत्त्वाचा केवळ सत्य दृष्टीनें ज्यांत विचार केला आहे असा आर्यधर्माखेरीज इतर धर्म क्वचितच सांपडेल. हीं तत्त्वें केोणतीं, त्याचा आपल्या जुन्या ग्रंथांतून कसा विचार केला आहे, ऐतिहासिक रीत्या त्याची उत्पात व अभिवृद्धि कशी झाली इत्यादिक गोष्टींचा विचार वास्तविक पाहतां आमचा आम्हीच करावयास पाहिजे होता; परंतु वर लिहिल्याप्रमाणें आमचे सर्व विचार आदिभौतिक विद्याकडे वळल्यामुळे अध्यात्मविद्येचा हल्ली आम्हास कंटाळा आला आहे. प्रोफे. म्याक्लमुलर यांनीं या विषयाचा आज कित्येक वर्षे व्यासंग केला असून त्याचे विचार अर्थातच परिणत झाले आहेत तेव्हा त्याच्या व्याख्यानातून आमच्या अध्यात्मक ग्रंथासंबंधानें जे उद्गार निघतील ते अर्थात्च प्रगल्भ असून विशेषत: आमच्या आधुनिक मंडळीस मान्य होतील अशी आशा आहे. आमच्यामध्यें अशा रीतीनें उद्योग करणारे लोक निघूं नयेत हे आमचे मोठे दुर्दैव आहे. तथापि दुःखात सुख एवढेच कीं, सदर तत्त्वविचाराचा अजिबात लोप न होता त्यास पाश्चिमात्यांच्या हातून कां होईना, पण उतजन मिळून त्याचा एका रीतीनें जीर्णोद्धार होत आहे. अशा रीतीनें तरी आमच्या जुन्या अध्यात्म ग्रंथाचे महत्त्व आमच्या लक्षात येवो म्हणजे झाले.