पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२२ लो ० टिळकांचे केसरींतील लेख आले तेव्हां * स्वामिन्, गजो मिथ्या ’ अशी आठवण देणाच्याचे समाधान स्वामींनीं ज्याप्रमाणे * मम पलायनमपि मिथ्या ’ असें उत्तर देऊन केले. त्याचप्रमाणें प्रस्तुतचा प्रकार आहे. आजपर्यंत ह्या गोष्टीची वाटाघाट झाली आहे. त्यावरून बोलणें आणि करणे हे सुधारणेचे दोन स्वतंत्र मार्ग असून एका मागांतील कुशल वाटाडेही दुस-या मार्गात कवडीमेल ठरतात, हे अगदीं निर्विवाद सिद्ध झाले आहे. याउप्परही एखाद्या बोलक्या सुधारकास वैधव्यपंकांत पडलेल्या गाईची करुणा न येता जर ती अष्टवर्ष देशीय अगर दशवर्ष देशीय बचडीचाच स्वीकार करील तर यात काहीं आश्चर्य करण्यासारखें नाहीं. अशा वेळीं असल्या गृहस्थास बोलल्याप्रमाणें न चालल्याचा दोष न देतां ** बाबारे, ” आपल्या स्वत:च्या उदाहरणावरून लोकास कशा व काय अडचणी असतात याचा नीट विचार कर व सुधारणेनें संचारित होऊन स्वत:च्या मनाची समता इतउत्तर बिघडू देऊं नकोस आणि विनाकारण आपल्या ज्ञातिबाधवांचीं मनें दुखवू नकोस ” असा उपदेश करणें आम्हास प्रशस्त वाटतें. आई, बाप, भाऊ, आतेमामी व इतर गणगेोत हीं सवांसच आहेत. या सवांच्या अनुमतानें व त्यांस बरोबर घेऊन जे आमचे पुढे पाऊल पडेल तेंच कायमचे व टिकाऊ होईल. याच्यासाठी आमच्या मनातील विचार काहीं वेळ दाबून ठेवावे लागतील, काहीं वेळा माघार घ्यावी लागेल, व काही वेळा बोलावयास पुढे व करावयास मार्गे हाही प्रकार घडून येईल. या सबबी अगर कारणें नवीं असून ती कोणासही नाकबूल होणार नाहीत; परंतु “ मला आईबापाची भीड मोडतां येत नाहीं म्हणून मी असें करतीं; तुम्ही मात्र आपल्या आईबापाची पर्वा ठेवू नका;” असें प्रतिपादन करण्याचा जेव्हा झोक दिसून येतो तेव्हा मात्र वरच्यासारखी उदाहरणे लोकाच्या उपहास्यतेस व तिरस्कारास पात्र होतात; व त्याजकडून ** तुम्हासच आईबाप आहेत; आम्हास नाहीत काय ? ' असा जबाब मिळतो. आमच्या बेगडी सुधारकाच्या प्रथम व्याख्यानाचा भपका पाहून आमचे लोक दिपले होते व अनेक विद्यामूलतत्वांतील ताच्यावरून खालीं आलेल्या मनुष्याप्रमाणे त्याची काहीं वेळ स्थिति झाली होती; परंतु आतां उत्तरोत्तर सुधारक यासही आईबाप असून सदर आईबापास संतुष्ट ठेवण्याची हे राजश्री तजवीज ठेवितात असें लोकांच्या लक्षात येऊं लागले आहे. आतां क्वचित् स्थलीं पहिल्या बाण्याचा एखादा सुधारक अद्यापीही असू शकेल; तथापि सामान्य स्थिति पाहिली म्हणजे आम्ही वर सागितल्याप्रमाणेच झाली आहे. अशा वेळी विनाकारण कोणाचे मन दुखविणें आम्हास योग्य दिसत नाहीं. शहाणा सरदार शिपायांची कुवत लक्षात आणूनच लढाईची सिद्धता करीत असतो; त्याप्रमाणें आमचे सुधारकाग्रणीही हीं उदाहरणें लक्षांत आणून आपल्या व्यवस्थेत कांहीं- फेरफार करतील तर हा तंटा लवकरच मिटेल आणि-अल्प कां होईना पण ती तरी कायमची सुधारणा होईल.