पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११६ लो० टिळकांचे केसरींतील लेख संवर्त, महाभारत इत्यादि ग्रंथांतून जीं वचनें आढळतात त्यावरून ऋतुकालापूर्वी दोन तीन वर्षे तरी स्त्रियाचा विवाह करण्याची पद्धत निदान अडीचहजार वर्षी . पासून तरी या देशात चालत आहे असें होतें. भवभूति व कालिदास यानीं आपल्या नायिका मोठया कल्पिल्या म्हणून त्या वेळचा प्रघात तसा होता हे म्हणणें प्रशस्त नाही, रा० ब० वैद्य यांचा मुख्य मुद्दा अशा रीतीने वादग्रस्त किबहुना असंभवनीय असल्यामुळे त्याच्या पायावर रचलेली इमारतही मनोराज्यातील इमारतीप्रमाणें मनेोरम पण अशाश्वत आहे. बालविवाह आम्ही म्हणती त्याप्रमाणे दोन अडीच हजार वर्षाचे जुने ठरल्यास शिकंदरच्या वेळेचे शूर शिपाई व पुलकेशी राजाचा भरभराट या दोन्हीही गोष्टी बालविवाह सुरू झाल्यानंतरच्याच आहेत असें मानावें लागतें. चिंतामणराव म्हणतात त्याप्रमाणें जर्मन अगर रोमन लोकांपेक्षा हिंदूलोक शरीरसामथ्र्यानें सामान्यतः कमी भरतील, परंतु हिंदूलोकांतील लढाऊ जातीही इतर देशांतील लढाऊ जातीपेक्षा आधक भित्र्या अगर पिळपिळीत आहेत असें मानण्यास आम्हास काहीं आधार दिसत नाहीं. जातिभेदामुळे आणि वर्णभेदामुळे प्रत्येक जातीकडे निरनिराळे काम सोपविलेले असे व त्या त्या कामाप्रमाणें तें ते आपली सामाजिक स्थिति राखीत. कुरुक्षेत्राच्या विस्तीर्ण मैदानावर कौरवपांडवाचे युद्ध चालले असता शेजारच्या खेड्यापाडयांतील शेतकरी मुकाट्यानें खाद्यावर आसूड टाकून आपल्या शेतांतून काम करीत नसत असें म्हणण्यास कांहीं प्रमाण नाहीं. राज्य करण्याचा अधिकार रजपुतांचा. तो जर त्यानी शेवटपर्यंत मन:पूर्वक चालविला असता तर हिंदुस्थानास मुसलमान लोकाच्या ताब्यांत जावे लागले नसते. दिल्ली व कनोज या दोन घराण्यानीं आपसांत कलह करून मुसलमानास आयताच दरवाजा उघडून दिला हें इतिहासांतील मर्म केोणाच्याही सहज लक्षात येण्यासारखे आहे. या रजपूत लेोकात अगदी शेवटपर्यंतही बालविवाहाचे प्रचार नव्हते व टाडसाहेबांनीं यांच्या शौर्याची इतकी तारीफ केली आहे कीं, त्यांच्यामतें यास हिंदुस्थानांतील स्पार्टन लोक असे म्हणण्यास हरकत नाहीं. असल्या शूर लोकासही इंग्रज सरकारनें निःशस्र करून हतवीर्य केल्याबद्दल टाडसाहेबांनीं आमच्या दयाळू सरकारास दोष दिला आहे. टाडसाहेबांचे हे उद्गार त्याच्या देशबंधूस रुचणार नाहीत तथापि देशांतील लोकांची स्थिति, शैौर्य आणि उत्साह, परकीय प्रभूच्या सत्तेखालीं कशी लयास पावतात याचे हैं उत्कृष्ट उदाहरण आहे. आतां रावब. चिंतामणराव वैद्य असे म्हणतील कीं, परकीयांच्या सत्तेखाली जाण्यासच बालविवाह कारण झाला आहे. परंतु ही कोटी इतिहासदृष्टया टिकेल असें आम्हास वाटत नाहीं. ऐरिश लोक आज सातशें वर्षे इंग्रज लोकांच्या अमलाखालीं आहेत, ते बालविवा • हामुळेच का ? ग्रीक व रोमन लोकांचीं राज्यें बुडण्यास स्त्रियांची अनीति