पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११२ लो० टिळकांचे केसरींतील लेख सामाजिक सभा राष्ट्रीय नाहीं; तिच्या ठरावार्ने कोणीही-मग तो सभेचा अध्यक्ष किंवा सेक्रेटरी कां असेना बाधला जात नाहीं, अगर सर्भेत पास झालेले ठराव अमलांत आलेच पाहिजेत अशी कोणाबरही जबाबदारी नाहीं; पाहिजे त्यानें मत द्यावे, पाहिजे तर देऊं नये; सभेच्या अपूर्वतेमुळे येतील ते तिच सभासद, मंडपांत राहतील ते तिचे मत देणारे आणि * अमुक गोष्ट चांगली आहे ? * अमुक गोष्ट झाल्यास बरै ' * अमूक गोष्ट करण्याची परवानगी असावी ’ इत्यादि विध्यर्थक वाक्यांनीं होतील ते तिचे ठराव; असें जर वेळींच जाहीर शाले असतें तर नागपूरचा संमारंभ याहीपेक्षां मोठ्या थाटानें उरकला असता. राबब. रानड यानीं सब्जेक्ट कमिटीते व परिषर्देत जीं उत्तेर दिलों तींच जरा अगोदर द्यावयास पाहिजे होतीं, तथापि * अकरणान्मंदकरणः श्रेयान्’ या न्यायानें रावब. रानड यानीं शेवटी तरी सभेची वस्तुस्थिति कबूल करून लोकांचा होत असलेला गैरसमज दूर केला याबद्दल त्यांचे आभार मानणें जरूर आहे ! सामाजिक परिषदेचे अध्यक्षु निवडण्याच्या कामींही रावब. रानड यानी आपलें चातुर्य प्रदर्शित केलें; मि. खापर्ड हे वयानें व दजीनें लहान असताही केवळ धैर्यानें त्यानीं समति कायद्याविरुद्ध खटपट करण्याच्या कामी पुढाकार घेतला या करतो त्याची रावबहादुरानी अध्यक्षाच्या जागीं निवडणूक केली हे रावबहादुराच्या गुणग्राहकत्वाचे मोठेच दर्शक आहे. संमतिवयाचा कायदा जुलुमी असून अन्यायाचा आहे अशा अर्थाचा ठराव परिषदेंत पास झाला असता तरी त्याची योग्यताही रावब. रानडयानीं स्वसंतोषानें मि. खापर्ड यास सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थान दिले याच्याशी ताडून पाहातां आम्ही कमी मानली असती. सामाजिक परिषदेसंबंधानें वर्तमानपत्रातून वगैरे काहीं दिवस जी टीका येत होती तीवरून वारा कोणत्या दिशेन वाहात आहे हे रावबहादुराच्या लक्षात येऊन चुकलें होतें, व प्रसंग आल्याबरोबर एकदम वाज्यास पाठ देऊन त्यानी त्याची गति कुंठित केली ! परिषदेस नवीन वळण लाविलें पाहिजे असें त्यांच्या मनानें घेतले व तें स्पष्टपणें बोलून दाखविण्याचा त्यांचा धीर झाला. प्रतिवर्षी निरानराळ्या प्रातातील सुधारक सभा या नांवानें रिपेोटीत मोडणाया सभांची वार्षिक हकीकत परिषदेपुढे मांडून मंजूर करण्यांत येत असे; परंतु यंदा तो विधि तहकूब ठेवण्यांत आला. आता पुढे चीहींकडून लागून निरानेराळ्या सभांचे सामाजिक परिषदेसाठीं जे मुखत्यार येतील तेवढयानीच जमून काय करावयाचे असतील ते ठराव करावे व अमलांत आणावे, असें घडून आल्यास सभेस पुष्कळ लोकांची खरी मदत व साह्य मिळेल. सर्व मोठया गोष्टींची सुरवात स्वल्प असतें. रोम शहर एका दिवसांत बांधलें गेले नाही अशा