पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामाजिक सुधारणा. : c و मुसलमानी व बौद्धधर्माचा प्रसार करणारांचीं भरपूर उदाहरणें घेऊन वर निर्दिष्ट केलेल्या उपायांपैकी किती साध्य आहेत व तेही केोठवर साध्य आहेत याचा शांतपणे व तिच्हाईतपणें कोणी तरी विचार करावयास पाहिजे होता, तो रा० वैद्य यांनी केला आहे. पुस्तकाच्या आरंभीं जी अनुक्रमणिका दिली आहे ती वरवर वाचिली असतांही आभच्या म्हणण्याची सत्यता वाचकास कळून येईल. सुधारणेवर अशा तन्हेंचे पुस्तक मराठींत तरी आजपर्यंत प्रसिद्ध झाले नव्हतें, व रा० वैद्य यांनीं मनांत आणल्याप्रमाणे याच तन्हेची विचारानें लिहिलेलीं जर दहाबारा पुस्तकें एकापाठीमागून एक प्रसिद्ध होतील तर त्याच्या हेतूप्रमाणें खरोखरच निदान मध्यम प्रतीच्या लोकांत तरी कांही चळवळ झाल्यावांचून राहणार नाहीं. वर्तमानपत्रांतील लेख कांहीं विशेष प्रसंगास अनुलक्षून असल्यामुळे त्यांतील * निवडक निबंधांत 'ही हल्लींच्या पुस्तकाप्रमाणें परिपूर्णता येत नाहीं. करिता हें पुस्तक एकदां तरी सर्वोनीं-मग तो इंग्रजी शिकलेला असो वा नसी-समग्र वाचार्वे अशी त्यांस आमची शिफारस आहे. तसेच देशाची सुधारणा होणें जर इष्ट आहे तर प्रत्येकानें यथाशक्ति हस्तेपरहस्ते त्या कामास मदतही केली पाहिजे हें उघड आहे. रा० वैद्य यानीं आपल्या पहिल्या पत्नीस हा ग्रंथ अर्पण केला आहे व तिचे स्मरणार्थ या कामीं पदरचे हजार दोन हजार रु. खर्च करण्याचा विचारही आहे; पण तेवढ्यानेंच १०॥१२ पुस्तकाच्या पाच पांच हजार प्रति छापून वाटण्याचा खर्च भागेल असें नाही. करिता सर्व खया सुधारणेच्छूनीं या सुधारणाधर्मकृत्यास यथाशक्ति द्रव्यद्वारा मदत करावी व सुधारणेचीं तत्त्वें सर्व लोकांत प्रसिद्ध करण्याचे अंशत: तरी श्रेय घ्यावें, अशी आमची त्यास प्रार्थना आहे. त्याचप्रमाणे आमच्या बंधूंनीही ह्या पुस्तकावर आपला अभिप्राय देऊन लोकाच्या नजरेस त्याची उपयुक्तता आणून द्यावी अशी त्यासही विनंति करून आज हा लेख संपवितों.

  • सामाजिक सुधारणा कशानें होईल ?

रा० रा० चिंतामणराव वैद्य यांचे पुस्तक वाटल्यास आज पंधरा दिवस झाले. इतक्या मुदतींत ते बूक ब-याच महाराष्ट्र वाचकाच्या हातून गेले असेल. तेव्हां त्यामधील विचार व मर्ते याबद्दल विस्तारेंकरून आज विवेचन करण्यास कांहीं हरकत दिसत नाहीं. रा० वैद्य यांचे पुस्तक वाचणाच्या गृहस्थाच्या लक्षात ही गोष्ट आलीच असेल कीं, सुधारणा इष्ट आहे कीं नाहीं याचा त्यानीं केोठेच ऊहापोह केलेला

  • ( ता, १८ नोव्हेंबर १८९० ).