पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०६ लो० टिळकांचे केसरींतील लेख त्याचा प्रयोग प्रथमतः जनावरावर करूं पाहातात, ” त्याप्रमाणें सुधारणेच्या कामी दंड थोपटून जे पहिल्यानें एका प्रसिद्ध जोडप्याचा पुनर्विवाह लावण्यास तयार झाले होते, तेच स्वत:वरच तो प्रसग आला असतां * अमक्यातमक्याची ’ किंवा * अमकीतमकीची ’ सबब सांगून एकामागून एक कसे मोकळे झाले व त्या कारणानें सुधारणा कित्येक दिवस कशी मागे पडली, याची थोडक्यांत पण विचारानें लिहिलेली हकीकत रा. वैद्य यांच्या लेखाशिवाय दुसरे कोठेही वाचकास सांपडणार नाहीं, बहिष्काराचे भय हल्लीं कमी झाले आहे किंवा बहुधा नाहींच म्हटल तरी चालेल; पण तीस वर्षापूर्वीची स्थिति याहुन अत्यंत भिन्न होती पेशवाईचा अम्मल नुकताच संपला होता व ज्याप्रमाणें हल्लीं बहुतेक बुद्धिवान लोक इंग्रजी विद्यासंपन्न असतात तसा तेब्हा प्रकार नसून जुन्या मतातली विद्वान् व वजनदार अशी पुष्कळ मंडळी होती; अशा वेळीं दहा पांच नव्या मताचे लोक एके ठिकाणी झाल्याखेरीज त्याचे हातून कोणतीही गोष्ट घडवून आणण्याचे तर राहूंद्याच, पण बोलवत देखील नस, ही स्थिति सुधारण्यास मोठा हिय्या करून पांच दहा मंडळी तयार झाला, पण जेव्हा त्यांजवरच * बोले तैसा चालें याप्रमाणें वागण्याचा प्रसंग अाला तेव्हा एकमेकास हरप्रसंगीं जिवास जीव देऊन मदत करूं अशा शपथाआणा झाललो मडळीही इसापनीतीतील दोन प्रवाशाप्रमाणें कोणी झाडावर तर कोणी विहिरीत अशी दडून राहिली ! मग अर्थातूच या मंडळीचा परस्परांवरील भरंवसा उडाला व काहीचे तर वाकडेही आले ! इकडे जुन्या पक्षाचा बोज राहावयाचा, पण या नवीन मंडळीस सरकार थेोडेंबहुत अनुकूल असल्यामुळे श्रीशंकराचार्याचेही वजन राहात नाहीसें झालें. तात्पर्य, हल्लीं सामाजिक बंधने शिथिल झाली म्हणून जी ओरड चालली आहे तिचे बीजही रा. वैद्य यांनीं दिलेल्या सुधारणेच्या खटपटीच्या इतिहासातच सांपडेल. यानंतर मि. मलबारी शेटजानीं सुधारणेचे जें पुनरुज्जीवन केले व दिवाणबहादुर रघुनाथराव यानी तें काम पुढे चालू ठेविले आहे, त्याचीही थेोडीबहुत हकीकत रा. वैद्य यांनी दिली आहे, परंतु या सर्वोपेक्षा महत्त्वाचा भाग म्हटला म्हणजे हल्लीं आपण जे नाना तन्हेचे ༤་༨ སཾས།། e सुधारणच माग काढले आहेत त्यांचा शातपणे या ग्रंथांत केलेला विचार होय. मि. मलबारी शेटजीची तुतारी सुरू झाल्यापासून कायद्याखेरीज सुधारणा शक्य नाहीं असें कित्येकांचे ठाम मत झाले आहे. कित्येक जण सुधारणेच्छलोकांनीं निराळा समाज काढावा असे प्रतिपादन करीत आहेत. कोणास धर्माध्यक्ष पाहिजेत, केोणास उपदेश पाहिजे, कोणास आचरण पाहिजे आणि कोणास ल्यूथरसारखे स्वार्थत्यागी सुधारणाग्रणी पाहिजेत. अशा वेळी या प्रत्येक विषयावर खिस्ती,