पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

& o c लो० टिळकांचे केसरींतील लेख बांधून घ्यावे. या बंधनाप्रमाणे वर्तन न घडल्यास तो अपराध समजून त्याबद्दल कडक शिक्षा ठेवण्याविषयी सरकारास विनंति करावी. ही शिक्षा जे हा मार्ग स्वीकारतील तेवढयांपुरतीच लागू होईल. अशा प्रकारे जो आपल्यास बाधून घेण्यास तयार असेल त्यानें सभेत आपले नाव कळवावें. माझ्या मतें ज्या सुधारणा अवश्य आहेत त्या खालीं नमूद केल्या आहेत. १. मुलीचे लग्न १६ वर्षाचे आत करूं नये. २. वीस वर्षाचे आत मुलाचे लग्न करूं नये. ३. पुरुषाचे लग्न ४० वर्षापुढे होऊं नये. ४. चाळीस वषांपुढे लग्न करणे झाल्यास विधवशीं विवाह करावा. ५. दारू पिणें बंद असावें. ६. हुंडी घेण्याची चाल अजीबात बंद करावी. ७. प्राप्तीचा दहावा भाग सार्वजनिक कामाकडे द्यावा. [ या मंडळीच्या कामीं. ] ८. विधवेचें वपन करूं नये. सदर सुधारणा अंमलात आणल्या असता जातिबाहेर टाकण्याची भीति बाळगण्याचे बिलकुल कारण नाहीं. २०० लेोकाच्या सह्या मिळाल्या म्हणजे तेवढयापुरताच सरकारापाशीं कायदा मागण्याची तजवीज करता येईल. सह्या कुटुंबवत्सल व ब्राह्मण जातीच्या लोकाच्याच मुख्यतः पाहिजेत. समाजाच्या सुधारणेस कायदाच पाहिजे असें प्रतिपादणा-या लोकापैकीं अशा रीतीने आपल्या स्वतःस कायद्याने बाधून घेणारे किती आहेत हें कळण्यास हा मार्ग उत्तम आहे. ता, २६ माहे आक्टेंबर सन १८९०. बाळ गंगाधर टिळक. CMMAMMAMAMMSMAAASAAAA स्फूट * तुळशीबागेतील जगी सभेच्या विषयास उद्देशून जेो पत्रव्यवहार, प्रतिसूचना व उपप्रतिसूचना या रूपाने पुढे आला त्याचा आता स्वतंत्र त-हेने विचार करण्यासाठीं गेल्या शनिवारी सायकाळी जेोशी हॉलमध्यें सभा भरली होती. तिचा निर्दिष्ट उद्देश मुख्यत: रा० टिळक याच्या उपप्रतिसूचनेसंबंधे वादविवाद करण्याचा होता, व काहीं सुधारकाग्रणी तुळशीबार्गेत हजर असून ज्यास आपलीं मर्ते दर्शित करतां आलीं नाहींत त्यांस मोकळेपणे व निर्धास्तपणे आपले विचार कळविता यावे हेंही इष्ट साधावयाचे होते, कीं तेणेंकरून उभयपक्षांच्या म्हणण्याचा

  • ता. ४ नोव्हेंबर १८९०,