पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जुळूमाची सुधारणा. ९१ सरकार म्हणजे मुलुखांतलीं आळशी माणसें ! सर्व, अथवा बहुतेक सर्व हिंदु समाजास मलबारी साहेबांचे म्हणणे पसंत नाहीं, असें पाहून त्यांनी आपल्या कानांवर हात ठेविले आणि * रामाय स्वति, कृष्णाय स्वस्ति ? ह्या मंत्राचा जप करण्यास आरंभ केला; म्हणजे शेटजींच्या कर्तबगारीबद्दल त्यांची पाट थोपाटली, व ‘आपण फार स्तुत्य कृत्य करीत आहात, आम्हास तुमचा खटाटेप पाहून भारी आनंद होतो, पण आपण म्हणतां तसें आम्हांस करितां येत नाहीं, ’ असा त्यांच्या म्हणण्यावर तेथे शरा मिळाला. सुधारलेल्या राज्यकत्याकडून जेव्हां असा जबाब मिळाला तेव्हा आताया अबलाकनवाळूच्या प्रयत्नाचे हातपाय गळाठतील असा स्वार्थसाधु ब्राह्मणांचा ग्रह झाला व शटजॉवर आलेल्या दुस-या एका निराशरूपी गदेनें त्याचे ताडव संपेल असें परपुष्ट मटजीमहाराज समजूं लागले. हा त्यांच्या कमी समजुतीचाच अर्थात् परिणाम होय. आपल्या कार्यसिद्धीच्या कामीं हजारों विझें आली तरी त्यास न जुमानतां आरंभलेलें कार्य शेवटास नेणाच्या * उत्तम जना ’ पैकीं शेटजी आहेत हे या अंध हिंदुसमाजास कसै समजणार ? खरोखरच त्याचे हे प्रयत्न भगीरथ आहेत. इकडे वाटाण्याच्या अक्षता मिळाल्यावर त्यानीं असा निश्चय केला कीं, आता या भकड हिदुस्थानसरकारचीं आर्जवें न करिता, जेथे सन्मताचीच उत्पति, अशा इंग्लंडदेशात जाऊन तेथे आपलें गाच्हाणें सांगावे आणि चक्रवर्तीनी व्हिक्टोरेिअा आईसाहेब याच्या हुजूर त्याच्या जातीच्या वतीनें फिर्याद करावी. असा इरादा धरून मलबारीसाहेबाची स्वारी स्वखर्चाने विलायतेस गेली आहे, व तेथे त्यानीं वजनदार गृहस्थांची एक सभा स्थापून विलायतेंत या प्रश्नाची तड लावण्याकरिता भयकर चळवळ करण्याचा संकल्प केला आहे हैं वर नुकतेच सांगितले आहे. येणेंप्रमाणे कायद्याच्या प्रश्नाची हकीकत आहे. आमच्याबद्दल अनुकंपा प्राप्त होऊन मलबारी शेटजींनी ह्या दोघाँद्योगास आरभ करून हरत-हेनें तो शवटास नेण्याविषयीं त्यांची शिकस्त चालली आहे व ह्या कार्यसिद्धीस्तव त्यांनीं आपले तन, मन, व धन इकडे अर्पण केले आहे हें पाहून खन्याखोट्या सुवर्णालंकारामध्ये दंग होणाच्या आम्हां आलस्यप्रिय हिदुलेोकास शरम वाटली पाहिजे व परहिताच्या कामी आपला देह झिजविण्याचे व्रत ज्यानीं अंगीकृत केले आहे, त्या शेटजींचे आभार मानून व आर्यभूमीवरही असली संतमंडळी कधी कधी निर्माण होते हें पाहून आपण आपल्यास धन्य मानून घेतले पाहिजे. पण या धन्यतेच्या भरांत, संतोषाच्या गर्दीत, व शरमेच्या घोंटाळ्यांत आपण इतर गोष्टी विसरता कामा नये. कोणतीही दुष्ट चाल दृष्टीस पडली कीं, तिच्या नाशार्थ उद्योग करू लागणें हें आपल्या कनवाळुत्वाचे दर्शक आहे; पण तितकेंच तें शहाणपणाचे आहे किंवा नाहीं याचा संशय नेहमीं राहणारच. बालविवाह, वैधव्य इत्यादि चाली वाईट आहेत, त्यांपासून पुष्कळ अनर्थ होतात वगैरे गोष्टी कोणाही समंजस पुरुषास नाकबूल आहेत असें नाहीं. असें विधान या पत्रांत अनेक वेळी केले आहे हें वाचक विसरले नसतीलच. कायदा का नको ह्याविषयीही अनेक वेळां या स्थलीं