पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९० ন্তীo टिळकांचे केसरीतील लेख चाली आहेत, त्यांच्या संहारार्थ ज्यांचा अवतार झाला आहे, त्यांस विलायतेंत सुद्धां स्वस्थ कसें बसवणार ? त्यांनी तेथे व्याख्यानें देऊन, मोठमोठ्या मनुष्यांच्या गाठी घेऊन, तेथील स्त्रियांमध्यें संक्षोभन करून शेवटीं एक प्रचंड कमिटी (व्यवस्थापकमंडळी) उत्पन्न केली आहे; आणि हिंदुस्थानसरकार आपल्या मतास हवें तितके पाठबल देत नाहीं तर विलायती मताचा शह हिंदुस्थानसरकारास देऊन त्यांच्याकडून स्त्रियाच्या सरक्षणार्थ कायदा करून घ्यावा अशी मशारानल्हे शेटजीसाहेबांची खटपट सुरू आहे. बारा बारा वर्षाच्या पोरींना दोन दोन तीन तीन मुलें होत आहेत; १० वर्षाच्या आत असणाच्या बालविधवांच्या हातून हजारों बाल्हत्या प्रतिदिनीं घडत आहेत, आणि या अनर्थमूलक पापाचरणानें लबाड ब्राह्मण लोक आपली तुंबडी यथेच्छ भरून घेत आहेत, असा अनाचार पाहून या साहेबांचे १५ वर्षांमार्गे जें पित्त खवळले व त्यास जी पुण्यप्रकोप प्राप्त झाला, त्याच्या योगाने सत्यासत्य विचाराचा याच्या मस्तकाच्या ठायीं लोप होऊन कोणत्याही हिकमतीने का होईना, पण हिंदुलोकास कायद्यानें निगडित करण्याच्या विचारास लागले पाहिजे असा मनाचा संकल्प झाल्यावर त्याच्या पुष्टिकरणार्थ पुरावा मिळविण्याकरितां जेव्हां त्याची स्वारी मुंबई इलाख्यांतून मद्रपुरांत, तिकडून वंगदशात वावरूं लागली, तेव्हां त्यांस धर्मशाळात, नदीच्या काठांवर, देवालयामध्यें, चार लोक आणि विशेषत: स्रिया याच्या तोडून बालहत्या, प्रसूतिवेदनांनीं प्राप्त झालला मृत्यु याशिवाय त्यांच्या कर्णपथावर दुसरा कोणताही उपदेश झालाच नाही. मराठे, तेलंग, बंगाली, रजपूत, गुजराथी इत्यादि लोकांच्या तोडात वाक्यें काय ? * आज बाई अमक्यातमक्या बाईनें बालहत्या केली, खरें काग ? ? * होय बाई ? दुसरी म्हणते. * पण करायचे काय ? आज तिची पाळी आहे, उद्यां आपल्यावर येईल, चल, दु:ख करून काय उपयेोग ? आपण सर्व एक दावणीला गुंतलेल्या आहोत. ’ असला सर्वगामी प्रकार पाहून शेटजींच्या आधींच संतप्त झालेल्या अंत:करणाला फोपाटा लागून तें करपून गेले आणि त्यानीं दोन प्रचंड पत्रकें काढून हिंदुलोकास त्याची हीं गृहछिद्रं पूर्णपणे दाखविण्याचा प्रयत्न केला; पण हिंदुलोक कसले निगरगट्ट ! १२ वर्षाच्या पोरीस आया करण्याचे कामीं आणि पहिला दशक उलटला नाही ती त्यांस वैधव्य स्थितींत नेऊन ढकलण्थाच्या कामों फारां दिवसापासून संवकलेल्या लबाड ब्राह्यणांच्या निर्दय अंत:करणावर खानसाहेबाच्या आक्रेशानें यत्किचित्सुद्धा परिणाम झालासें दिसेना.कांहीं थोडी दयाळू मनुष्यें त्यानी आपल्या गोटात ओढली इतकेंच. एकंदरीत या कागदी लढाईत दारुगोळा पुष्कळच खर्च होऊन लभ्यांश विशेषसा झाला नाहीं. हें पाहून शेटजी भिऊन जाऊन आपल्या अंगावर धेतलेलें विकत श्राद्ध टाकून देतील असे पुष्कळास वाटलें. पण आमचे दयाळू पारसिक बंधु असल्या अडचणीना जुमानणारे नव्हते. त्यांनीं लागलीच आपला मोची कलकत्याकडे फिरविला. तेथेही आपल्या पाताळयंत्री स्वभावानें हिंदुस्थानसरकारची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण