पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जुळूमाची सुधारणा. <ぐ。 (२) वैवाहिक हक्काप्रमाणें वर्तणूक करायला लावण्याचा अधिकार कायद्यानें दिवाणी कोर्टास दिला आहे ती काढून घ्यावयाचा. ( ३) लहानपणीं लग्न झाले असल्यास पुढे वयात आल्यावर तें लग्न कायम करण्याचा अगर रद्द करण्याचा अधिकार वधूवरांस ठेवणे म्हणजे नवयाशीं संबंध होण्यापूर्वी त्याच्या बायकोच्या मर्जीस आल्यास तिला लग्नसमारंभ झालेला रद्द करता यावा, मग त्यावेळीं नवरा जीवंत असे वा मृत असेो. (४) आईबापांना आपल्या मुलांचीं लझे लाबणीवर टाकता यावी म्हणून त्थांना कायद्याची मदत मिळावी. जर त्याचे जातभाई अगर शजारीपाजारी याबद्दल उघडपणे त्यांच्या विरुद्ध काही खटपट करतील तर ती कायद्याप्रमाणे अपराध गणला जाऊन त्यास शिक्षा सांगितलेली असावी, (५) १८५६ चा विधवापुनर्विवाहाचा कायदा १८८६ मध्यें सरकारानें मनांत विचार आणला होता त्याप्रमाणे बदलावा, निदान विधवा स्त्रियांस नवन्याच्या मृत्यूपत्रांत लिहिलेले हक्क उपभोगतां यावे. (६) पुनर्विवाहाचा विधि सोपा करावा, व यासाठीं रजिष्ट्रारपुढे प्रतिज्ञवर दोनतीन जाब झाले म्हणजे पुरे असे ठरवाव. (७) देवाला मुली वहावयाच्यासंबंधानें कायद्यात कलमे आहेत त्याची अंमलबजावणी सक्तीनें व्हावी. (८) सुधारणेकरितां ज्या मंडळ्या स्थापन झाल्या आहेत किंवा होतील त्यांना सरकारचे साहाय्य व उतजन असावे. (९) दहावर्षानंतर देखील मुलींनी शाळेत राहावें, त्याचप्रमाणे विधवांनी वैद्यकी आणि मास्तरणीचे काम शिकावे, यांसाठी सवलती व उतजन देणे. अशा प्रकारची मलबारी शेटजींनी खटपट आहे. तिजबद्दल अाज जास्त लिहिण्यास सवड नाही. पुढे एखादवेळ पाहूं.

  • जुळूमाची सुधारणा.

आम्हा हिंदुलोकाच्या अभ्युदयाकरितां ज्या अनेक विभूति निर्माण झाल्या आहेत त्यांतीलच एक मलबारी शटजो आहेत याविषयी आता कोणासही शका उरली नाहीं. शरीरप्रकृति बिघडली म्हणून विश्राति घेण्याकरिता त्यानी विलायः तचा मार्ग सुधारला आहे हेंही सवाँस अवगत आहेच. तेथील अनिवार सुखात दंग होऊन केवळ विश्राति सुखाचा अनुभव घेण्याकरिता ते गेले हें खरे, पण * मूळस्वभाव जाईना ’ या म्हणीप्रमाणे हिदुसमाजामध्ये ज्या घोर व अपायकारक 붓 ( ता. २ सपटेंबर १८९० ). ११