पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

くく लो० टेिळकांचे केसरीतील लेख सुधारणेकडे लोकांचे लक्ष अधिक जाऊं लागलें हाही एक फायदा झाला आहे. तेव्हां मलबारी शटजींच्या अश्रांत श्रमाबद्दल, त्यानीं सोसलेल्या निंदे बद्दल त्यांनी घालून दिलेल्या उदाहरणाबद्दल आम्ही त्याची स्तुति करावी हें वाजवी आहे. असो; येथपर्यंत आपल्या कर्तव्यानुसार मलबारी शटजींचे ऋण फेडल्यानंतर त्यांच्याचसंबंधानें एका गोष्टीविषयीं खेद दर्शविणें जरूर दिसतें. खेद अशाबद्दल कीं, परकी गृहस्थानें आमच्या हिंदुसमाजाच्या सुधारणेबद्दल जितके करावयाचे तितके त्यानी केले. आमच्या समाजांत त्याच्या दृष्टीनें दिसणारे दोष त्यानीं दाखविले. आम्ही त्यांच्याकडे लक्ष नेऊन आपापल्यापरी सुधारण्याचा प्रयत्न करूं लागली. आता यापुढचे काम वास्तविक आमचे राहिले. लोकमताचा ओघ वळविणे व नंतर सरकारापाशीं जाऊन हा वळलेला ओघ ठाम करून टाकण्याकरितां कायदा मागून घेणें हे आमचे काम. समाजाची स्थिति कायदा मागण्या पर्यंत आली आहे किंवा नाही हें आमचे आम्ही पाहिले पाहिजे; आणि या प्रश्नाचे उत्तर आमच्यांतील पुढाच्यांस जसे देतां येईल तसे इतरास देता येणार नाही. अशी वास्तविक स्थिति असतां मलबारी शटजींनीं अजून देखील आपला क्रम चालू ठेवावा, इतकेच नाही तर खुद्द विलायतेची सफर करून हिंदुस्थानसरकार कायदा करण्यास तयार नाही असें पाहून त्याच्यावर विलायतच्या लोकांचा (विशेषत: बडयाबडया दरबारी मडळीचा) दपटशहा आणावा या हेतूनें तेथे खटपट चालवावी हे आम्हास गैर दिसतें. हिंदुस्थानांतल्या हिंदुस्थानात जोपर्यंत त्यांचा प्रयत्न चालू होता तोपर्यंत त्याच्या हातून गैरसमजामुळे गैरवाका मजकूर समजाविला गेला असता तो आम्हास समजण्याचा पुष्कळ संभव होता. विलायः तेंत चाललेल्या खटपटीची इत्थभूत हकीकत कळणें महामुष्कील आणि त्यातून मलबारी शेटजीनी आपली खटपट तेथे फारच गुप्तपणें चालविली आहे. कालरेजी हाती आलेल्या इंडिया पत्राच्या अंकात यासंबंधाने जी हकीकत आली आहे तिजवरून असे कळते कीं, मलबारींनी आपल्या मताला पुष्कळ माजी इंडियन कामदार आणि काहीं बडे इग्रज गृहस्थ वळविले आहेत. एका लोकहितार्थ झटणाच्या बाईंच्या घरीं नुकतीच मलबारी शेटजींच्या बरोबर विचार करण्याकरितां एक सभा भरली होती. त्या सर्भेत कोणास आमंत्रण करावयाचे यासंबंधाने पुष्कळ त-हेवाईक प्रकार दिसला. तेथे असे ठरलें कीं, कायद्यांत काहीं मोठासा फेरफार करण्याविषयीं कांही खटपट करावयाची नाहीं; मात्र पुढील मुद्दे सरकारच्या नजरेस आणण्याच्या कामीं वजन खर्च करावयाचे: (१) जबरी संभागाच्या बाबतीत कायद्यांत नवराबायकोच्या व्यवहाराविषयी जो अपवाद दिला आहे तो रद्द करावयाचा, म्हणजे बारा वर्षाच्या आंत कोणतीही स्त्री कोणत्याही कृत्यास अनुमोदन देण्यास लायख नाहीं असें ठरवावयाचे.