पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८६ लो० टिळकांचे केसरींतील लेख एकंदर स्त्रीजातीचा विचार करतां ही पद्धत अगदीं अपायकारक आहे व स्त्रीशिक्षणाचा प्रसार करण्याचे काम ज्यांनीं आपणाकडे घेतलें आहे त्यांनीं य गोष्ठीचा विचार करावा अशी आमची त्यांस सविनय विनंति आहे. मलबारी शटजींचा उद्योग.* जेथून आपल्याला खालीं लोटून दिले असेल तेथपर्यंत पुनः उडून येण्याचा गुण चेडूत आढळतो व तो आपल्या अंगांत कसा येईल हें जाणण्याविषयीं मनु ष्याच्या मनाची खटपट चालू असते. जगामध्ये कितीही अडचणीचे प्रसंग आले, आपल्या उद्देशसिद्धयर्थ चाललेल्या प्रयत्नात आपल्याला कितीही ठोकरा खाव्या लागल्या, तरी मनांत दृढनिश्चय ठाम करून हाती धरलेल्या कामाची चिकाटी सोडावयाची नाही अशा प्रकारची माणसे या जगात फार कमी आढळतात आणि आपल्या लोकात त्यांचा बहुतेक अभावच आहे. अशी स्थिति असल्यामुळेच आमचे कोणतेंही काम नीट रीतीनें व सारख्या जोरानें चालत नाहीं. * आरंभशूराः खलु दाक्षिणात्याः ’ अशी म्हण आहे, पण * दाक्षिणात्याः ’ या शब्दाच्या ठिकाणीं साच्या हिंदुस्थानवासी प्रजेचा वाचक शब्द घातल्यास चूक होणार नाही. असा जेो हा दुर्मीळ गुण तो जेथे आढळेल तेथे त्याचे आभिनंदनपर स्वागत गाइलें पाहिजे. मुंबईतील इंडियन स्पेक्टेटर पत्राचे कर्ते मि. बेहेरामजी मरवानजी मलबारी याचे नाव आमच्या वाचकास श्रुत आहेच. याच्या आगीं आम्ही ज्या गुणाविषयीं वरतीं लिहिले आहे तो गुण ओतप्रोत भरलेला आहे. यानीं हिंदुसमाजसुधारणेचे कंकण हातीं बाधल्याला आज पाचसहा वर्षे झालीं. इतक्या काळात त्याच्या श्रमाने व खटपटीने आणि त्या दोहॉपासून उत्पन्न झालेल्या चळवळीनें सुधारणेच्या कार्यास बरीच मदत झाली यांत काही शंका नाही. त्यांनी सुचविलेल्या गोष्टी पुष्कळाना मान्य झाल्या नाहीत व होतील असे वाटत नाही. त्यांच्या लेखाच्या व त्यापासून माजलेल्था वादविवादाच्या योगानें सुधारकमंडळींत तीन तट झाले:-एकास कायद्याची मदत घेणें अवश्य वाटतें. दुस-याचे असें मत आहे की, अगोदर उपदेशद्वारा लोकमताचा प्रवाह तुमच्या मताला आणून जोडा, निदान बहुमत तरी तुमच्यासारखे आहे असे दाखवा, आणि बहुमत जसें तसा कायदा मागा. तिसराही एक पक्ष असा आहे की, जर कायदाच पाहिजे असेल तर प्रथम आपल्यापुरता कायदा मागून घ्या. आपल्या स्वतःला अशा रीतीनें बांधून घेऊन केोणतीही सुधारणा अमलांत आणून दाखवा. तिचीं सुफलें दिसू लागलीं कीं इतर भित्रे लोक आपोआप त्या मार्गाला वळतील. अशा प्रकारें जरी तीन वर्ग सुधारकांतल्या सुधारकांत दिसू लागले आहेत, आणि त्यामुळे

  1. (ता. १२ आगस्ट, १८९०).