पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(संपादन सुरू आहे)

८० लो. टिळकांचे केसरींतील लेख

महातत्त्वांच्या अमलाच्या गुंगीत तुमच्या म्हणण्यांत व वस्तुस्थितींत किती फरक आहे तो तुम्हांस दिसत नाही. आजपासून हजार दोन हजार वर्षांनी मनुष्यमात्राची काय स्थिति झाली पाहिजे किंवा व्हावी हा विचार सुधारणेच्या कामी जरी महत्त्वाचा आहे तरी खरे सुधारक जे आहेत ते तो विचार आजच अमलांत आणण्याचा कधींही प्रयत्न करीत नाहींत व हाच न्याय प्रस्तुत प्रकरणीं लागू पडतो.