पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

फीमेल हायस्कुलांतील शिक्षणक्रम ७९


निरूपयोगी आहे. एवंच या शिक्षणक्रमाण्त जर कांहीं फरक न होईल तर इतके पैसे प्रतिवर्षी पाण्यांत टाकल्याप्रमाणे होणार आहेत.


फीमेल हायस्कुलांतील शिक्षणक्रम.*

(नंबर ४)

आजपर्यंत आम्ही यासंबंधानें जे लेख लिहिले त्यावरून स्त्रीशिक्षणाच्या संबंधानें आमचा व स्त्रीहायस्कुलाच्या उत्पादकाचा कोठे मतभेद आहे हें वाचकाच्या लक्षात आलेंच असेल. तथापि या स्त्रीहायस्कुलाच्या काहीं भक्तमंडळींनीं आमचे प्रतिपादन दांभिक आहे असा आमच्यावर आरोप आणण्याचा प्रयत्न चालविला आहे; करिता त्यासंबंधानें आज येथें थोडासा विचार करूं.

फीमेल हायस्कुलातील सद्य:शिक्षणक्रमाचे भक्त हो ! तुम्हास जर असें भासत असेल कीं पाश्चात्य विद्येच्या परिशीलनानें सुधारणेच्या अत्युच्च कल्पना तुमच्याच मात्र मेंदूंत कोंदल्या गेल्या आहेत व ----तिरिक्तजनांनी तुमच्यापुढें आपल्या विचाराची रिपरिप न लाविता मुकाट्यानें तुम्ही म्हणतां त्यासच मान डोलवावी, नाहींतर आपल्या विद्येचा राजीनामा द्यावा,- तर तुम्हास आमचें इतकेंच सागणें आहे की तुम्ही ज्या कालामध्यें पाश्चात् विद्येचें अद्ययन केलें तो काल व आजचा काल अगदी भिन्न आहेत. पाश्चात् विद्येच्या जास्त प्रसाराने म्हणा किंवा तुम्ही जी कामे गेल्या पाचपंचवीस वर्षात हाती घेतलींत व त्यांस तुम्हास जें यश प्राप्त झालें व तुमचा जो दृढनिश्चय लोकाच्या नजरेस आल त्यामुळे म्हणा, सुधारणेचे अत्युज्ज्वल स्वरूप जरी तुम्हाआम्हास एकच दिसत आहे, तरी प्रस्तुत कालीं आमचें कर्त्यव्य काय यासंबंधाने तुमचा आमचा बहुधा अपरिहार्य मतभेद आहे. संसाररूप शकटाची गति स्त्री व पुरूष या दोन चक्राच्या आधीन आहे व त्यातील एक चक्र मागे पडलें तर तो शकट खड्ड्यात पडेल्; स्त्री ही पुरूषाची सहधर्मचारिणी आहे; करिता तिच्या साहायावाचून पुरूष एकटाच जर पुढे जाऊं म्हणेल तर तें कधीही शक्य होणार नाहीं; शिक्षणाने ज्याप्रमाणें पुरूश बिघडले नाहींत त्याचप्रमाणें स्त्रियाही बिघडण्याचा संभव नाही; इ. इ. तुमच्यामतें तुमचीं अनन्योपभोग्य सुधारणेचीं उच्चातिउच्च् हीं तत्वें आहेत त्याचा प्रत्येक वेळी जप करून काहीं उपयोग नाही. या तत्वानीं तुमची डोकी इतकीं फिरून गेलीं आहेत की प्रस्तुत आपणास काय कर्त्यव्य आहे याची कल्पनाही तुमच्या डोक्यात शिरत नाही. एकानें सुधारणेच्या तत्त्वाची ढोलकें पिटावें व त्याच्या भक्त मंडळीनें त्याच्या भोंवती वेड्याविद्र्या उड्या मारून 'अहोरूपमहोध्वनि:' असा एकच कल्होळ करावा, याच्यापलीकडे अद्याप तुमची गति झाली नाहीं व सुधारणा


  • (ता. २५ आक्टोबर, १८८७).