पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७८ लो. टिळकांचे केसरींतील लेख

आमच्याकडे तरी अन्योन्यप्रतियोगीसंबंध असल्यामुळें अशी उदाहरणें फारच विरळा. त्याचप्रमाणें युरोपिअन आहारविहाराचें व ललितकलांचें ज्यास संसारांत सुख घेतां येईल अशाचीही संख्या कमीच. तेव्हा ज्या फीमेल हायस्कुलातील शिक्षण पुरूषाप्रमाणें असून युरोपियन त-हेवर आहे त्या शाळेचा दहापांच श्रीमंत लोकांखेरीज कोणासही उपयोग नाहीं. आमच्या बायकास लिहितां वाचतां येऊन त्यांस गृयकृत्यें चागल्या त-हेनें करण्याचें शिक्षण मिळावें, राहिल्या वेळांत पुराणादि वाचून त्यांनीं आपली आत्मोन्नति करावी व आपणांस संसारात मदत करावी ही प्रत्येक मध्यम स्थितींतल्या सुशिक्षित पुरूषाची इच्छा आहे. कारागिरांस ज्याप्रमाणे धंदा मुख्य व शिक्षण हे उपांग असते, त्याचप्रमाणें बायकासही साधारणत: गृहकृत्य मुख्य व शिक्षण आनुषंगिक आहे. करितां कारागिरांस ज्याप्रमाणें धंदा शिकून किंवा शिकत असतां उपयुक्त शिक्षण देण्याची सोय करितात त्या सारखीच सोय स्त्रियासही अवश्य आहे. परंतु सर्व गृहकृत्यें सोडून दररोज ११ पासून ५ वाजेपर्यंत ख्रिश्चियन मास्तरिणीबरोबर पाश्चात्य विद्येची घोकंपट्टी करण्यांत मुलीच्या वयाचीं पहिली १५/१६ वर्षे घालविण्यास कोणीही तयार होणार नाहींत; व फीमेल हायस्कुलात मध्यम स्थितीतील लोकाच्या विवाहित मुली फारशा नाहींत याचें कारण तरी हेंच. एका इंग्रजाचें असें म्हणणें आहे कीं, धंदेशिक्षणात कारागिरीचा भाग प्रथम शिकविला पाहिजे. कारण मुलें मोठीं झालीं म्हणजे मग त्यांचा कामावर हात चांगला बसत नाही. आमच्या स्त्रियाचीही गोष्ट काही अंशी याप्रमाणेंच आहे. १५/१६ वर्षांपूर्वीच तिला गृहकृत्याची चांगली माहिती पाहिजे, व ती घरात जितकी मिळेल तितकी शाळेत कधीही मिळणार नाही. स्त्रीशिक्षणाचें सासर हें एक वर्कशॉप आहे. त्या वर्कशॉपमधून न काढिता त्यास उपयुक्त व स्वधर्मानुकुल उदार शिक्षण देण्याची जर कांही सोय असेल तर ती आम्हास पाहिजे आहे. ही सोय होऊन जर ज्युआ कोणास हवें असेल त्यास पाश्चात्य शिक्षण देण्याची सोय करिता येईल तर चागलेच. परंतु दुसरीकरितां पहिलीचा त्याग करून उपयोग नाहीम्. पहिली सोय प्रधान आहे व तीच आज आम्हास मुख्यत्वें हवी आहे. या फीमेल हायस्कुलापासून असा काहीं उपयोग होईलसें वाटत होते, पण ते स्कूल मध्यम प्रतीच्या लोकास असूननसून सारखेंच झाल्याप्रमाणें आहे.

तात्पर्य. प्रायमरी शिक्षण व मास्तरिणीचा धंदा शिकविणें या कामीं फीमेल हायस्कुलाचा उपयोग द्विरुक्त्त असल्यामुळे तें अनवश्यक आहे; पुरूषाप्रमाणें स्वतंत्र धंदे करण्याचें शिक्षण देण्याचा विचार असेल तर तो कित्येक शतकेंपर्यंत अशक्य असल्यामुळे व फारच झाले तर त्यापासून दहापांच श्रीमंत स्त्रियांस आज कदाचित् उपयोग होण्याचा संभव असल्यामुळे त्या कामीं खर्च होणा-या पैशाचा अपव्यय होत आहे; व हल्लींचा शिक्षणक्रम आमच्या मध्यम स्थितीतील लोकास हवा त्याप्रमाणें चालीस, रीतीस व धर्मास अनुकूल नसल्यामुळें तो 


















.