पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७६ लो. टिळकांचे केसरींतील लेख

बचावाकरिता का होईना या शाळेच्या व्यवस्थापकांकडून थोडथोडी माहितीही पण जास्त मिळू लागली. अखेरीस परवा प्रसिद्ध करण्याजोगा बहुतेक भाग त्यांनी आमच्या ग्रामस्थ वृद्धबंधूंच्या मुखाने वदविला. हा शिक्षणक्रम साधारण मध्यम स्थितीतील लोकास कितपत फायदेशीर आहे याचा थोडासा विचार गेल्या अंकी आम्हीं केलाच आहे. तथापि स्कुलाच्या उद्देशाची व त्याची सागड घालण्याकरितां पूर्वी अर्धवट चर्चा झालेल्या या स्कुलाच्या उद्देशांबद्दल आज येथें थोडासा विचार करूं.

आमच्याकडे मुलाप्रमाणे मुलींच्याही शाळा स्थापन होऊन आज बरींच वर्षे झालीं आहेत, व त्या बहुतेक आता सुरळीत चालूं लागल्या आहेत. मुलाच्या मानानें पाहता मुलींच्या शाळेतून सुधारणा होण्यास अजून बरीच जागा आहे. तथापि त्याकरिता नवीन स्कुलाच्या स्थापनेची काहीं जरूर नव्हती. त्याचप्रमाणे मुलीच्या शाळेवर असणारे अधिकारीही स्त्रिया असल्यास बरें असे वाटून फीमेल हायकुलापूर्वी फीमेल ट्रेनिंग कॉलेजाचीही आमच्याकडे स्थापना झाली होतीच. तेव्हा वरील दोनही प्रकारच्या शाळा विद्यमान असता फीमेल हायस्कुलची आमच्या प्रमुख मंडळीनी जी उभारणी केली तिचा उद्देश वरीन दोनही उद्देशाहून निराळाच असला पाहिजे. फीमेलहायस्कूल आमच्या लहन मुलींकरिताही नव्हे, व मास्तरिणी होऊं पाहणा-या स्त्रियाकरिताही नव्हे. आता हायस्कुल ही तरी एक शाळाच असल्यामुळे व दुस-या काही कारणांमुळे हायस्कूलाच्या व्यवस्थापकांनी त्या शाळेंत वरील दोनही वर्गांची सोय केली आहे. परंतु या शाळेचा 'नवीन हायस्कूल' या नात्याने जेव्हा आपणास विचार कर्तव्य आहे तेव्हां या हायस्कुलात सामील केलेली मुलींची शाळा, प्रिपेरेटरी क्लास, पहिली व दुसरी यत्ता, व मास्तरिणीचा धंदा शिकण्याकरिता आलेल्या गरीब किंवा अनाथ स्त्रिया या सर्वास एकीकडे काढून ठेविलें पाहिजे. यांच्याकरिता या हायस्कुलावर इतके पैसे खर्च करण्याची जरूर नाहीं; व खर्च होत असलेल्या पैशाचा लोकांस योग्य मोबदला मिळतो की नाही याचा विचार करिताना त्यात याचे गणना येत नाही. हायस्कूल ही प्रायमरी मुलीच्या शाळाच्या पुढची पायरी आहे, व प्रायमरी मुलीच्या शाळातून न मिळणारे शिक्षण देण्याकरितां हे फीमेल हायस्कूल आहे. येथपर्यंत ठीक आहे, पण या पुढचा मार्ग इतका सुगम नाहीं. आपल्याकडे मुलींची लग्नें ऋतु प्राप्त होण्यापूर्वीच करण्याची वहिवाट व शास्त्र असल्यामुळें, व एकदां मुलीचे लग्न झालें म्हणजे सासरीं तिची हळूहळू तिची गृहकृत्याकडे योजना होत असल्यामुळे मुलींच्या शाळांतून विवाहित स्त्रियांची संख्या फारशी, किंबहुना मुळीच नसते असे म्हटलें असता चालेल; व विवाह झाल्यानंतर शाळेचें दर्शन झाल्यामुळें तत्पूर्वी मुलीस जें कांहीं थोडेंबहुत ट-फ येत असतें तेंही ती विसरून जाते. सारांश, मुलीच्या शाळेपासून बायका शिक्षित असल्यापासून समाजास जो फायदा व्हावयाचा तो होत नाहीं हे अगदीं उघड आहे. हीच