पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(२)


त्यांना प्राप्त झालें होतें तरी अशा विषयांतहि तात्त्विक चर्चा म्हणून जेथें जेथें उद्भवली तेथें तेथेंहि टिळकांचे उपरिनिर्दिष्ट गुण प्रस्तुत खंडातील लेखांतून प्रगट झाले आहेत. पूर्वीच्या तीनहि खंडातील लेखांहून प्रस्तुतच्या खंडातील लेखांचे वैशिष्ट्य व अपूर्वत्व कोणासहि दिसून येईल. आणि टिळक व राजकारण यांचा अखंड संबंध मराठी वाचकानी मनांत जोडून ठेविलेला असल्यामुळे, त्यानीं पूर्वी विशेष लक्षपूर्वक न वाचलेले किंवा टिळकांच्या राजकीय चळवळीच्या झपाट्यात विसरून गेलेले हे लेख मराठी वाचकाना आता मोठे कौतुकास्पद वाटतील यात शंका नाहीं. ते वाचणाराना सामाजिक, धार्मिक विषयाच्या चर्चेत टिळकाची समाजरचनाविषयक तत्त्वे व धोरणे काय होतीं हेहि कळून येण्यासारखे आहे.

    प्रस्तुत खंडातील लेख केसरीच्या फाईलांतून शोधून निवडून काढणे, छापखान्याकरिता त्याची प्रत तयार करविणें वगैरे बाबतींत चि. काशिनाथ नरसिंह केळकर, वाड़मयविशारद, टिळक विद्यापीठ व चि. महादेव धोंडो विद्वास एम्. ए एल एल. बी. वकील पुणें याची सर्वांशीं मदत झाली; व हें काम त्यानीं निरपेक्ष बुद्धीने, केसरी-मराठा संस्थेच्या अभिमानाने केलें, याबद्द्ल आम्ही त्याचे आभारी आहों.

न. चिं. केळकर

धों. वा. विद्वांस

ट्रस्टी केसरी व मराठा.