पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७४ लो. टिळकांचे केसरींतील लेख

जर तें कुटुंब गरीब असेल, तर तसें करणे त्यांस किंबहुना जरूरही पडतें. अशा समाजस्थितींत स्त्रियांस ज्या शिक्षाणाची आवश्यकता आहे, तिचा आमच्याकडे काय उपयोग होणार? आमच्या मुलींची लग्नें निदान ऋतु प्राप्त होण्यापूर्वी तरी झालींच पाहिजेत व लग्न झाल्याबरोबर त्यास पतिगृहीं जावेच लागणार. सारांश, अमेरिकेतील मुलींप्रमाणें पितृगृही काम नाहीं व पतिगृह प्राप्त झालें नाहीं, अशी त्याची कधींच स्थिति नसते. तेव्हा आमच्या स्त्रियांस जें शिक्षण द्यावयाचें तें स्वतंत्र धंदा करितां यावा म्हणून नव्हे; तर संसारांत जी त्याची कर्त्यव्यें आहेत तींस त्यास चांगली करिता यावीं, यासाठीं द्यावयाचें. ज्या शाळेंत हें शिक्षण मिळत नाही तिचा आम्हास काहीं उपयोग नाहीं व तिची भरभराट कधीं व्हावयाची नाही. कित्येक लोकाचें असें मत आहे कीं, ज्याप्रमाणें इंग्रजी विद्येच्या संस्काराने आपण आपल्या जुन्या रीतीभातींवर पाणी सोडण्यास तयार झालों आहो, त्याप्रमाणेंच जर स्त्रियास शिक्षण दिलें तर मग साहेब आणि मडम दोघेंही बूटस्टॉकिंग चढवून बंडगार्डनची हवा खाण्यास जाण्यास तयार होतील ! पण हा समज अगदी चुकीचा आहे. हल्लीं इंग्रजी विद्येनें पुरूषाच्या मनावर जे परिणाम होत आहेत व अनावर वर्तन करण्याचे जी इच्छा कित्येकात उत्कट झाली आहे, तीच कितपत स्पृहणीय आहे याचा वाद आहे. तर, जें शिक्षण पुरूषासही सर्वांशी हितकारक आहे कीं नाही याचा संशय आहे, तेच स्त्रियास दिलें असता त्याचा परिणाम दुप्पट अहितकारक होईल यांत शका कोणती? ज्या इंग्लंडदेशाचें आपण अनुकरण करण्यास इच्छितों, तेथेंही स्त्रियास वरिष्ठ प्रतीचें शिक्षण गेल्या पाचपंचवीस वर्षातच देऊं लागले आहेत. मग त्याची आमच्याकडेच एवढी घाई कां? आपले विवाह प्रौढपणीं होऊं लागले, आपली अविभक्त कुटुंबावस्था मोडून गेली, आपलीं धर्म व नीति यांचीं जुनीं बंधने शिथिल झालीं, व आपल्याकडील मध्यमस्थितींतील गृहस्थलोक दोन पैसे संग्रही राखून राहूं लागले म्हणजे तुमच्या इंग्रजी शिकलेल्या, पियानोवर सुस्वर गाणा-या, व किंडरगार्टन डान्स नाचणा-या व सीता, अहिल्याबाई याच्या ऐवजी ग्रेस डार्लिंग व इलिझाबेथ याच्या गोष्टी सागणा-या स्त्रिहायस्कुलांतून निघालेल्या मुलींस किंमत येईल. ज्यांस आपल्या धर्माचा व गृहकृत्याचा कंटाळा आला नाहीं अशाच, पण थोडेसें लिहितां वाचता येणा-या, स्त्रिया आजमितीस पाहिजे आहेत व ज्या स्कुलाच्या शिक्षणानें एतद्विरूद्ध परिणाम होतात त्याची आम्हास जरूर नाही. सासरीं किंवा माहेरीं रोजचें थोडेंबहुत घरचे काम करून मधल्या वेळात दोन तीन तास स्त्रीधर्मास व हिंदुधर्मास उचित असे स्त्रियास शिक्षण देण्याचें जर कोणी मनांत आणिले तर ती गोष्ट साध्य आहे. पण जेथें सर्व धर्मांच्या मुली एकत्र करून त्यांस पुरूषांप्रमाणे ११ ते ५ वाजेपर्यंत इंग्रजी बाई आग्लभौम शिक्षण देणार, ती शाळा एक अतिश्रीमंतांच्या किंवा अनाथ झाल्यामुळें झाल्यामुळें कांही तरी धंदा करण्याची ज्यांस जरूर आली