पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

फीमेल हायस्कुलांतील शिक्षणक्रम ६९

दुसरें काम नाहीं काय? आमच्यामतें हिंदुस्थानसरकारनें या बाबतींत आज पडण्याची कांही जरूर नव्हती व आमच्या सुधारकासही आमची अशीच सूचना आहे. हिंदुस्थानसरकारानें लोकांची मते विचारलीं आहेत यावर त्यांनीं न जातां सरक्युलरांतील पहिल्या भागावर योग्य मत देऊन दुसरा भाग आपणास अमान्य आहे, असे सरकारास स्पष्ट कळविण्यांतच त्यांचे शहाणपण आहे. रघुनाथरावांप्रमाणें आकाशांत उड्या मारण्यात काहीं हंशील नाहीं. इंग्लंडातही नव-याजवळ राहण्यास बायको नाखुष असल्यास तेवढ्या करणावरून तिला काडी मोडून देतां येत नाहीं, असें सरक्युलरातच स्पष्ट आहे. बायकोची नाखुषी असून आणखी नवरा व्यभिचारी असेल तरच स्त्रीस काडी कोडून देण्याचा अधिकार येतो. तेव्हां इंग्लंडातच जी गोष्ट मान्य होणार नाहीं तिचा येथें आग्रह धरण्यांत काहीं हंशील नाहीं. सरकारानी कांही केले तरी काडी मोडून देण्याची वहिवाट वरिष्ठ जातींत पडावयाची नाहीं, व ज्या जातींत हल्लीं ती वहिवाट आहे त्या जातींतही नव-याजवळ राहण्यास बायको नाखूष आहे एवढ्याच कारणाकरिता विवाहसंबंध तोडण्यास लोक कबूल होतीलसें आम्हांस वाटत नाहीं. तात्पर्य, हिंदुस्थानसरकारची सूचना कोणासही पसंत पडेलसे दिसत नाहीं व आमचे सुधारक जर या कामीं आग्रह धरतील तर ते आपलें फुकट हंसें मात्र करून घेतील. सरते शेवटीं सदर सरक्युलर अभिप्रायाकरिता ज्या लोकाकडे येईल त्यांनी या गोष्टीचा नीट विचार करून आपला अभिप्राय द्यावा अशी त्यास सूचना करून हा लेख पुरा करितों.


फीमेल हायस्कुलांतील शिक्षणक्रम*
नंबर १

येथील फीमेल हायस्कूल स्थापन होऊन आज तीन वर्षे झाली. इतक्या मुदतीत या शाळेच्या बक्षिस समारंभासमयीं व अन्यत-हेनें जी माहिती लोकांपुढे आली तीवरून या शाळेच्या संबंधानें येथील वर्तमानपत्रांतून बरेवाईट बरेच चरचरीत लेख आले. पण जो जो आपली लेखणी स्त्रीशिक्षणावर चालवील तो असंस्कृत, अज्ञ व दुराग्रही अशीच प्राय: या शाळेच्या उत्पादकांची समजूत असल्यामुळेंच की काय कोण जाणे, त्यानीं या सर्व लेखाचा फारसा विचार केला नाही. पुढें त्याचा भ्रम दूर झाल्याने म्हणा, अगर विरुद्ध पक्षाच्या जास्त चळवळीनें म्हणा, शाळेच्या उत्पादकाचें मौनव्रत जरासे शिथिल झालें व 'तरूणीशिक्षणनाटिका' कर्त्यांच्या एका मित्राने केलेल्या कडक टीकेस उत्तराच्या रूपानें येथील आमच्या एका वृद्धबंधूच्या मुखाने या हायस्कुलातील शिक्षणक्रम नुकताच बाहेर निघाला आहे. शाळेतील हाच शिक्षणक्रम जर लोकमतास


  • (ता. २८ सप्तेंब्बर, १८८७).