पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६६ लो. टिळकांचे केसरींतील लेख

वधेना पि यदात्वेतान्निग्रहीतुं न शक्नुयात्
तदैषु सर्वमप्येतत् प्रयुंजीत चतुष्ट्यं |

म्हणजे प्रथम राजानें सामोपचारानें सागून पाहावें, न ऐकेल तर निर्भर्त्सना करावी, त्यानेंही ताळ्यावर येत नाही तर धनदंड करावा, तितक्या उपरही शुद्धीवर येत नाहीं तर वधदंड म्हणजे नाककान कापणें, कैद वगैरे (शरीरदंड समजावा असें कुल्लूक म्हणतात, कारण वध म्हणजे फाशी असा अर्थ घेतल्यास "वधेना पि" हा दुसरा श्लोक लागत नाहीं) शिक्षा द्यावी, इतकेही करून काहीं चालत नाही तर सर्वांची एकदम योजना करावी ! तात्पर्य, राजाज्ञा न मानल्यास वादीप्रतिवादीस ती आज्ञा मानण्यास तयार होईपर्यंत पूर्वी तुरुंगात ठेवीत असत. हा राजदंड झाला; पण याखेरीज साहसी स्त्रीस:--

भार्या पुत्रश्च दासश्च शिष्यो भ्राता च सोदर:
प्राप्तापराधास्ताड्या: स्यु: रज्ज्वा वेणुदलेन वा पृष्ठतस्तु शरीरस्य नोत्तमागे कथंचन |

असा गृहदंड करण्यास मनूनें पतीस अधिकार दिला आहे. तसेच प्रायश्चित्तप्रकरणात गुरूमातृपितृत्यागाची उपपातकात गणना करून त्यांस प्रायश्चित्तही सांगितलें आहे. एतावता स्त्रीनें पतीचा पूर्वोक्त कारणचतुष्ट्याखेरीज त्याग केल्यास त्यास तिन्ही दंड मनूनें सागितले आहेत; राजदंडाबद्दल स्मृतिग्रंथाच्या प्रमेयाप्रमाणेंच नेटिव्ह संथानातील आचारही आहे. तस्मात् आमच्या धर्मशास्त्राप्रमाणें व आचाराप्रमाणें स्त्री पतीकडे न जाईल तर तीस राजदंड आहे;व ती राजाज्ञा मान्य न करील तर तिला कैदेतही टाकीत असत असें सिद्ध होतें.

उपसंहार

अस्तु, लिहिता लिहिता बिषय बराच लांबला याबद्दल वाचकांची व रा.ब.ची माफी मागून हा लेख संपवितों. हिंदुधर्मशास्त्राचे इतक्या विस्तारानें प्रतिपादन करण्याची आमची इच्छा नव्हती. पण रावबहादुर माधवरावजींसारख्या शोधक, व लोकमान्य विद्वानानें वक्तृतसमारंभात आम्हांस उद्देशूनच भाषण केल्यावर त्यांनीं केलेलें विवेचन अन्यथा आहे असें दाखविणें आम्हांस भाग पडलें. रा.ब.ची ग्राहकता, बुद्धिमत्ता व लोकहिताकरितां श्रम करण्यची हौस हीं इतरांप्रमाणे किंबहुना जास्तच आम्हांस मान्य आहेत. पण या प्रकरणीं त्याचा आमचा थोडासा अर्थिप्रत्यर्थी संबंध आल्यामुळें तेवढ्यापुरतें त्या संबंधास अनुरुप असें वर्तन आम्हांस ठेवणे जरूर पडलें. वस्तुत: रावबहादुरांस धर्मशास्त्राच्या भानगडीत पडण्याची मुळींच जरूरी नव्हती. आजकाल कोणतीही सुधारणा करणें असल्यास, डॉ. कीर्तिकर म्हणतात त्याप्रमाणे, ती सयुक्तिक, आवश्यक व