पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रावबहादुर रानडे यांचे अपूर्व युक्तिचापल्य ६५

स्पष्ट सांगितले आहे. पण तेंही बिचारें रा.ब.च्या समोर येऊन उभें राहिलें नाहीं. निजलेल्यास कोणी जागें करील पण जाग्यास जागें कोण करणार ? तेव्हां रा.ब.स सोडून वाचकांच्या समाधानाकरिता मनूंत वाक्यपारूध्यप्रकरणीं अशाच त-हेनें पितापुत्र, गुरूशिष्य, पतिपत्नी यांचे संबंधात दंड सांगितला आहे तो येते देतो:--

मातरं पितरं जाया भ्रातरं तनयं गुरुं
आक्षारयत्शतं दाप्य: पंथानं चाददद्गुरो : |

'आक्षारयन्' याचा कुल्लूकानीं "दुर्भाषण-शिविगाळ करणारा" असा अर्थ केला आहे. याही वचनाचा व अर्वाचीन सुधारलेल्या राष्टांतील धनीचाकर, पतिपत्नी वगैरे संबंधांच्या कायद्यांचा मिळून सर्वांचा एकदमच अर्थवाद करावा असें जर रा.ब. म्हणत असतील तर त्याच्या विद्वत्तेस धन्य मानिलें पाहिजे.दुसरे काय? आतां राहतां राहता एक मुद्दा राहिला. तो असा कीं पतीचा त्याग करणा-या स्त्रीस दंड आहे, पण कैदेची शिक्षा कोठें आहे? आहे; जरा दम धरा. आधीं हल्लींच्या कायद्यांत कैदेची शिक्षा केव्हां आहे ती पाहूं. हल्ली असा कायदा आहे कीं नवराबायकोची फिर्याद कोर्टापुढें आली म्हणजे प्रथम योग्य कारणावांचून पतीचा त्याग केला असल्यास स्त्रीस पतीकडे जाण्यास कोर्टाने सागावे.हा कोर्टाचा हुकूम स्त्री अमान्य करील तर तीस कैदेंत टाकावी. कैदेची शिक्षा प्रथम नाहीं. हिंदुधर्मशास्त्रांतही असेंच सागितलें आहे. राजानें वादीप्रतिवादी आपणापुढे आले म्हणजे प्रथमत: कोर्टाचा हुकूम ते मान्य करतील याबद्दल त्याजकडून जामीन घ्यावा :--

उभयो: प्रतिभूर्गाह्य समर्थ: कार्यनिर्णये | "

असे याज्ञवल्क्यांनी सागितलें आहे. असा जामीन त्यानीं न दिल्यास विज्ञानेश्वर म्हणतात :-- "तस्यासंभवे र्थिप्रत्यर्थिनो रक्षणे पुरूषा: नियोक्तव्या: तेभ्यश्च ताभ्या प्रतिदिनं वेतनं देयं तथाह कात्यायन: | अथ चेत्प्रतिभूर्नास्ति कार्ययोग्यस्तु वादिन: संरक्षितो दिनस्यांते दद्यात् भृत्याय वेतनमिति |" म्हणजे त्यांस तेव्हांपासूनच कैदेंत टाकावें. तात्पर्य; हल्लींपेक्षांही जुनें धर्मशास्त्र कडक होतें. हल्लीं ही फिर्याद दिवाणी आहे; पूर्वी प्रथमच जामीन घेत असत. व तो न दिल्यास तेव्हांपासूनच कैदेंत टाकीत. राजाकडे जायाचें तर तो सांगेल तें न ऐकल्यास दंड पाहिजेच. ए-हवी कोर्टाचा किंवा राजाचा हुकून मानतो कोण ? मनूनें म्हटलें आहे:--

वाग्दंडं प्रथमं कुर्याद्धिग्दंडं तदनंतरं
तृतीयं धनदंडं तु वधदंडमत:परं |