पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लो. टिळकांचे केसरींतील लेख

आहे तर त्यांनीं जो अर्थवाद माजविला आहे तो कशाकरिता? घें महाभारतांतील वाक्य आणि जोड मनुस्मृतीस; व्यभिचार व्यभिचार तो काय्? ऋतु-स्नानानें धूऊन टाकला म्हणजे झालें; कर असें प्रतिपादन; दे सगळी शास्त्रसारणी झुगारून' अशी जी त्यांनीं अनन्वित धुमश्चक्री आरंभिली आहे ती काय म्हणून ? स्वपक्षाभिमानानें अंध झालेल्या रा.ब.खेरीज कोणाही विद्वानास वक्तृत्वसमारंभसमयीं अशा त-हेनें बोलण्याचें साहस झालें असतें काय? अस्तु; आपण आपल्या प्रकृत विषयाकडे वळूं. साहस व स्त्रीसंग्रहणप्रकरणीं स्त्रीने पतीचा, शिष्याने गुरुचा, पुत्रानें पित्याचा वगैरे त्याग केल्यास त्यास मनूंत:--

पिताचार्य: सुह्रन्माता भात्या पुत्र: पुरोहित: |
नादंड्या नाम राज्ञो स्ति य: स्वधर्मेन तिष्ठति |

असा सामान्य दंड सांगून नंतर :--

ऋत्विजं यस्त्यजेद्याज्यो याज्यं चर्त्विग्त्यजेद्यदि
शक्त कर्मण्यदुष्टं च तयोर्दंड: शतशतं |
न माता न पिता न स्त्री न पुत्रस्त्यागमर्हति
त्यजन्नपतितानेतान्राज्ञा दंड्य्: शतानिषट् |

असा पुढें विशेष दंड सागितला आहे याज्ञवल्क्यस्मृतींतही साहसप्रकरणीं:--

पितृपुत्रस्वसृभ्रातृदंपत्याचार्यंशिष्यका:
एषामपतितान्योन्यत्यागी च शतदडभाक् |

अशी मनूप्रमाणेंच शिक्षा सांगितली आहे. नारदस्मृतींतही साहसप्रकरणी अक्षरश: हेंच वचन आहे. इतक्या स्मृतींतून व्यवहाराध्यायात एकाच प्रकरणांत इतकी सारखी वचनें सांपडत असता "पतीचा त्याग करणा-या स्त्रीकडे साहसपारूष्यादि दोष न येता तिचा अधिविन्न स्त्रियांत समावेश होतो." असे जे रा.ब.नी प्रतिपादन केलें आहे तें कितपत समंजस आहे याचा वाचकानीच विचार करावा. रा.ब. दुसरें असे म्हणतात की, या सर्व वचनाचा अर्थवादच केला पाहिजे; "कारण पतिपत्नीच्या संबंधाशिवाय इतर संबंधार असा दंड पूर्वी होत नव्हता व आतांही होत नाहीं. तेव्हां अशा त-हेनें एकमेकांचा त्याग करणें स्मृतिकारांस इष्ट नाहीं एवढाच बोध यापासून घ्यावयाचा !" केवढा सत्यापलाप हा ! रा.ब. हल्लीं चालू असलेलेही कायदे विसरले वाटतें. कोणत्याही देशाचा अर्वाचीन कायदा पाहा. त्यांत धनीचाकर (Master and servant), पितापुत्र (Guardian and ward) पतिपत्नी (Husband and wife) गुरुशिष्य (Apprentice) हें कायदे आहेत. पण ते आमच्या रा.ब.स कोठून दिसणार ? ही अर्वाचीन काळची व्यवस्था झाली. प्राचीनकाळीं वर विज्ञानेश्वरांचा पितापुत्रादिकांचा व्यवहार होतो म्हणून जो सिद्धांत दिला आहे त्यांतच ह्या सर्व संबंधास राजानें दंड करावा असें